28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeएज्युकेशनशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे-फडणवीस यांच्या चंद्रकांत पाटील यांना तातडीने बैठकीच्या सूचना

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे-फडणवीस यांच्या चंद्रकांत पाटील यांना तातडीने बैठकीच्या सूचना

मागील आठ दिवसांपासून विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक कृती समितीच्या वतीने शिक्षकेतर कर्मचारी (non-teaching staff) यांनी संप (strike) पुकारला आहे. यामुळे परीक्षा व महाविद्यालयीन कामकाज बाधित होत आहे. त्याबाबत आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेत तातडीने बैठक घेण्याच्या सूचना मंत्री पाटील यांना केल्या आहेत.

सुधारित सेवांतर्गत आश्वसित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10-20-30 वर्षांनंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू करणे, सातव्या वेतन आयोगानुसार वंचित असलेले 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या कालावधीतील वेतनाची थकबाकी अदा करणे, विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी करणे, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल!

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; गैरवर्तन केल्यास पाच परीक्षांसाठी निलंबन

राष्ट्रपतींनी केला एकनाथ शिंदेंना फोन!

दरम्यान, 7 फेब्रुवारी रोजी कलिना येथे बुक्टू आणि शिक्षक भारती यांच्या संयुक्त बैठकीत संपाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी