28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeएज्युकेशनविद्यार्थ्यांच्या आधारसाठी शिक्षकांचा 'प्रशासकीय' छळ!

विद्यार्थ्यांच्या आधारसाठी शिक्षकांचा ‘प्रशासकीय’ छळ!

राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे कार्ड काढताना झालेल्या अनेक चुकांमुळे त्यांचे आधारकार्ड अवैध ठरले आहे, त्यामुळे ते अपडेट करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट कसे करायचे? हा प्रश्न असताना मात्र वेतनकपात, सुटीत ही कामे करा अशा सूचना देत शिक्षकांचा छळ सुरु असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. शाळा प्रवेशासाठी आधार ओळखपत्राची सक्ती करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही पोर्टलवर आधार अपडेट करा, अशा सूचना वारंवार शालेय शिक्षण विभागाकडून येत असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडला आहे.

विशेषत: राज्यातील तब्बल 4 लाख विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची या पोर्टलवर अद्याप नोंद झालेली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेच्या पटावर असले तरी शिक्षण विभागाच्या अधिकृत नोंदीत नाहीत. त्यामुळे येत्या 15 मेपर्यंत संचमान्यता अंतिम होण्यापूर्वी या विद्यार्थ्यांच्या आधारचे काम न झाल्यास हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार, असा इशारा देण्यात आला आहे.

स्टुडंट पोर्टल संकेतस्थळावर राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. या संकेतस्थळावर आता शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक टाकणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या आधार असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधारेच संचमान्यता करुन प्रत्येक शाळेची शिक्षकसंख्या ठरणार आहे. यामुळे आधार ओळखपत्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या हीच त्या शाळेची पटसंख्या नोंदवली जाणार आहे. यासाठी आधार कार्ड तयार करणे, ते संकेतस्थळ उपलब्ध करणे, त्याची एक प्रत पोस्टद्वारे संबंधित पालकाला पाठवणे यातील कोणतेच काम शिक्षकांच्या हातात नसताना त्यासाठी शिक्षकांना जबाबदार धरले जात आहे.

एकंदरीत आधार नोंदणीची ही जबाबदारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांवर टाकलेली आहे. शाळा सोडून शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन आधा केंद्रावर कसे जातील ? त्यांनी अध्यापन करावे की आधार केंद्रात चकरा माराव्यात, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला आहे. प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांना आधार केंद्रावर घेऊन जाण्याचीही जबाबदारी शिक्षकांवर लादत आहे. हे काम केले नाही तर पगार रोखण्यात येईल, असे इशारे देणारे फतवे काढले जात आहेत यावर शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा: 

परदेशात शिकणाऱ्या मुलाला शिष्यवृत्ती न मिळाल्याने बापासमोर कर्जाचे डोंगर

अखेर ITI विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मिटला; मंगलप्रभात लोढा यांनी केली मोठी घोषणा

डीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या वयस्कर शिक्षकाचा मृत्यू

Student Aadhaar Update, Teachers burden from administration to update school students Aadhaar, Student Aadhaar Update : Teachers burden from administration to update school students Aadhaar, Aadhaar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी