मुंबई विद्यापीठाने ‘विद्यार्थी संवाद’ उपक्रम सुरु केला आहे. आज या उपक्रमाच्या माध्यमातून परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक समस्यांचे लवकरात-लवकर निवारण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी आज विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थित सर्व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले. (The ‘Vidyarthi Samvad’ initiative is proving successful in resolving student grievances)
आज उपस्थित विद्यार्थ्यांनी राखीव निकाल, गुणपत्रिका, आणि पात्रता असे अनुषंगिक प्रश्न उपस्थित केले. काही विद्यार्थ्यांस तात्काळ गुणपत्रिका देण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. (The ‘Vidyarthi Samvad’ initiative is proving successful in resolving student grievances)
मुंबई विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या यांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (The ‘Vidyarthi Samvad’ initiative is proving successful in resolving student grievances)
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता ‘या’ दिवशी होणार निवडणूक
विद्यार्थ्यांच्या शंकाचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी विद्यापीठात विद्यार्थी संवाद उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. तसेच, मुंबई विद्यापीठाद्वारे सुरु केलेल्या या उपक्रमातील पुढील संवाद 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 ते 5.00 वाजेदरम्यान आयोजित केला गेला आहे. हा उपक्रम मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज भवन येथे करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य असेल. (The ‘Vidyarthi Samvad’ initiative is proving successful in resolving student grievances)