33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशनTeacher day: महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना मिळणार द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस

Teacher day: महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना मिळणार द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस

दर वर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाह‍िर केले जातात. या वर्षी देखील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. येत्या 5 सष्टेंबरला या तीन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.

दर वर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाह‍िर केले जातात. या वर्षी देखील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. येत्या 5 सष्टेंबरला या तीन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. या शिक्षकांमध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामु नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना मिळाला आहे. मुंबईतील छत्रपती नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय श‍िक्षक पुरस्कार जाहिर झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहिर केलेल्या पुरस्कारांमध्ये 46 शिक्षकांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

हे सुद्या वाचा

Mantralaya : ‘मंत्रालया’च्या नावाने अधिकाऱ्यांची ‘वसुली’ !

Education : व्हिजेटीआयचा अजब कारभार, कनिष्ठ शिक्षकाकडे दिले संचालकपद !

Mamata Banerjee : मला अटक करुन दाखवा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाजपला खुले आव्हान

या वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात‍ राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतीदिन श‍िक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1888 रोजी डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म झाला. ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा विषयी आदर होता.

शिक्षकांना गुरूजी आणि बाई या नावाने हाक मारली जात होती. शाळा म्हणजे विद्येचे मंदिर समजले जात होते. आता शाळांचे व्यापारीकरण झाले आहे. शिक्षक म्हणजे लाखो करोडो मुलांना घडवीणारा कुंभार आहे. काही दशकांपूर्वी शिक्षक असणे हे खूप मानाचे समजले जायचे. आत तो नोकरीचा एक भाग झाला आहे. आपल्या देशात अनेक शिक्षक आदर्श शिक्षकाची भूमीका पार पाडतात. त्यामुळे त्यांचा या दिवशी सत्कार केला जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी