30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeएज्युकेशनUPSC Exam 2023 : नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी!

UPSC Exam 2023 : नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी!

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा प्राथमिक परीक्षा (UPSC) किंवा सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स (CSE) 2023 साठी अर्ज प्रक्रिया आज, 21 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ज्या उमेदवारांनी अद्याप परीक्षेचे फॉर्म जमा केले नाहीत त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. यंदा केंद्रीयआयोगाच्या या परीक्षांसाठी सुमारे 1,105 पदांसाठी नोंदणी होत आहे. (UPSC Exam 2023)

युपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवार 21 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस प्रिलिमरी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्राथमिक परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात येणार आहे. प्राथमिक परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पुन्हा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. मुख्य परीक्षेत पास झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

UPSC, CSE या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचे अनुसरण करा.

असा करा अर्ज :
– सर्वातआधी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2022 लिंकवर क्लिक करा.
– लिंकवर क्लिक केल्यानंतर सूचना वाचा.
– अधिसूचना वाचल्यानंतर नागरी सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करा.
– ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक माहिती भरा.
– तपशील नीट वाचा आणि महत्वाची कागदपत्रे अपलोड करा.
– आता सबमिट बटणावर क्लिक करा.
– अर्ज फी भरा.
– अर्ज फी भरल्यानंतर अर्ज स्क्रीनवर दिसेल.
– आता अर्ज डाऊनलोड करुन घ्या.
– अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.

हे सुद्धा वाचा: MPSC बाबत मोठी अपडेट, नवी परीक्षापद्धत २०२५ पासून लागू करण्यास सरकार राजी

IAS भूषण गगराणी यांचे मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षार्थींना दिल्या टीप्स !

Dahiwadi News : युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी डाॅ. नितीन वाघमोडेंच्या खास टिप्स

अलीकडेच, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा संपवणाऱ्या नागरी सेवा इच्छुकांची याचिका फेटाळून लावली आणि COVID-19 चा हवाला देऊन अतिरिक्त प्रयत्न करण्यास सांगितले. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे की, प्रस्तावित भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा परीक्षा (IRMSE) यावर्षी होणार नाही आणि त्याऐवजी, UPSC, CSE 2023 चा उपयोग उमेदवारांना निवडण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. एकंदरीत या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण आहे. दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय पोलिस सेवेसाठी कर्मचारी निवडण्यासाठी नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी