29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeएज्युकेशनUPSC परीक्षेत महाराष्ट्राचा डंका; 70 अधिक उमेदवारांनी पटकावले यश

UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा डंका; 70 अधिक उमेदवारांनी पटकावले यश

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीव्दारे 2022 सालासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात 933 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यातील 70 हून अधिकजण महाराष्ट्रातील आहेत. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. देशात यंदा मुलींनी बाजी मारली असून महाराष्ट्रातून देखील कश्मिरा संखे हिने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर देशपातळीवर ती 25 व्या स्थानी आहे. आज जाहीर झालेल्या निकालात पहिल्या 100 जणांमध्ये महाराष्ट्रातील 7 हून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील आहेत.

अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत दिवसेंदिवस मराठी टक्का वाढत असून मराठी अधिकाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. काही वर्षांपूर्वी बोटावर मोजण्याएवढी संख्या महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची असे. आता मात्र युपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत महाराष्टातील टक्का वाढताना दिसून येत आहे. परीक्षेचा अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

सन 2022 साली घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेत यंदा महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार उत्तीर्ण झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत.

(25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडेपाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265). दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552) लोकेश पाटील, (558) ऋतविक कोत्ते, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691) सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762)अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922) निहाल कोरे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (IAS) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (IFS) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (IPS) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश; पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

वडिलांची चहाची टपरी, आई विडीकामगार पोरानं पांग फेडलं; मंगेश खिलारीचे युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश

UPSC परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली   

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 473 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 201, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 45 , इतर मागास प्रवर्गातून – 122, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 69 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –36 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 131 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 12 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 33, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 19 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 933 उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिलांचा विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर 101 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी