28 C
Mumbai
Wednesday, December 7, 2022
घरएज्युकेशनYoga Foundation Course : मोरारजी देसाई इन्स्टिट्यूटमधील योग विज्ञान फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी नोंदणी...

Yoga Foundation Course : मोरारजी देसाई इन्स्टिट्यूटमधील योग विज्ञान फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी नोंदणी सुरू! अशाप्रकारे करा अर्ज

मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाने नोव्हेंबर 2022च्या वेलनेस सत्रासाठी योगा सायन्समधील फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी सुरू केली आहे.

आजकालच्या आधुनिक जगात मनुष्याला स्वतःसाठी वेळ काढणे अवघड होत आहे. कामाच्या तणावामुळे अनेकांना मानसिक समस्या उद्भवण्यास देखील सुरू होतात. या सर्वातून मुक्तता मिळवण्यासाठी भारतीय संस्कृतीमधील योगाभ्यासाची मदत होत असल्याचे अनमेक जाणकारांकडून सांगितले जाते. मात्र, हा योगाभ्यास शिकण्यासाठी विश्वासू व्यासपीठ फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, आता या गोष्टीची चिंता मिटली असल्याचे दिसून येत आहे. मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाने नोव्हेंबर 2022च्या वेलनेस सत्रासाठी योगा सायन्समधील फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी सुरू केली आहे. संस्था ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने एक महिना (50 तास) कालावधीचे वर्ग उपलब्ध करून देईल. उमेदवार कोणत्याही पेमेंट पद्धतीचा वापर करून ऑनलाइन फी भरून योग शास्त्रातील फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी करू शकतात.

या प्रकारे फी भरा
उमेदवारांनी रेकॉर्डसाठी केलेल्या पेमेंटचा स्क्रीनशॉट/फोटो/क्लिक ठेवावा लागेल आणि मागणीनुसार तो तुमच्या वर्ग शिक्षकांसोबत शेअर करावा लागेल. त्यानंतर उमेदवार भरलेल्या रकमेचा व्यवहार आयडी, भरण्याची तारीख आणि बँकेचे नाव तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरू शकतात. पेमेंट तपशीलाशिवाय, प्रवेश रद्द किंवा नाकारला गेला असे मानले जाऊ शकते. अर्ज भरताना उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे / उमेदवाराचे स्वतःचे छायाचित्र देखील अपलोड करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

Producer Kamal Kishore : पत्नीला कारने धडक दिल्याच्या प्रकरणात निर्माते कमल किशोर यांना अटक; आज न्यायालयात होणार सुनावणी

Mumbai : कुत्र्यांना खाऊ घालण्यासंदर्भातील निर्णयाविरोधात मुंबईत प्राणीमित्र संघटनेचे आंदोलन

PAK vs ZIM : पाकिस्तानचा पराभव होताच सोशल मीडियावर ‘मिस्टर बीन’ ट्रेंडिंगला; वाचा काय आहे प्रकरण

उमेदवार सकाळ किंवा संध्याकाळच्या बॅचसाठी अर्ज करू शकतात. बॅचेस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहेत. yogamdniy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अभ्यासक्रम मोड, बॅचच्या वेळा, अर्जाची लिंक आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्वे यासंबंधी माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना नीट वाचल्या पाहिजेत.

भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये योग प्रशिक्षण कार्यक्रमात एकसमानता राखण्यासाठी, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने एक समान योग प्रोटोकॉल विकसित केला आहे. NMC ने सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये प्रवेश घेतलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या सध्याच्या बॅचमधून यूजी अभ्यासक्रमांसाठी योग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!