30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदे संतापले, उद्धव ठाकरेंना आव्हान दिले !

एकनाथ शिंदे संतापले, उद्धव ठाकरेंना आव्हान दिले !

टीम लय भारी

गुवाहाटी : बंडखोरीच्या सातव्या दिवसानंतर एकनाथ शिंदे प्रत्यक्षात माध्यमांसमोर आले. त्यांनी आम्ही लवकरच मुंबईला येणार आहोत असे सांगितले. दुपारी एकनाथ शिंदे हाॅटेल रेडिसन बाहेर आले. त्यांनी गेटच्या आतून माध्यमांशी संपर्क साधला. आमच्या पुढच्या घडामोडी दिपक केसरकर सांगतील. ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. पुढच्या निर्णयांची माहिती तुम्हाला मिळेल, असे एकनाथ शिंदेनी सांगितले. शिंदेंनी शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. आपण महाराष्ट्रात येण्याची तयारी करत असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत.

आम्ही हिंदुत्त्वाचा लढा पुढे घेवून जात आहोत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमचा लढा आहे. आम्ही अजूनही सेनेसोबत आहोत. स्वतःच्या स्वार्थासाठी इथे कोणीही आलेले नाही. आपण निश्चिंत रहा, काळजी काळी करु नका, 50 आमदार स्वतःच्या मर्जीने आमच्या सोबत आले आहेत. आमदारांविषयी खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसवल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांचा माध्यमांशी बोलतांना ही लढाई आपण जिंकणार, असा आत्मविश्वास दिसत होता.

गुवाहाटीतील सर्व आमदार आनंदात आहेत. तुमच्या संपर्कात कोणते आमदार आहेत. त्यांची संख्या न सांगता, नावे सांगा, असे आव्हान त्यांनी आदित्य ठाकरेंना दिले. काळजी करु नका, आम्ही लवकरच मुंबईत येणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे सुध्दा वाचा:

‘भाजपा लबाड, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यांना फोन केलेला नाही’

फुटीर आमदार अनिल बोरनारे मलिदा खाणारे, शिवसेना मेळाव्यात चंद्रकांत खैरेंचा घणाघात !

राजकारणाच्या वादळात मराठी अभिनेत्यांनी घेतली उडी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी