28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ‘आगडम तगडम‘ काम नको

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ‘आगडम तगडम‘ काम नको

टीम लय भारी

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री 12 वाजता नाशिकला पोहोचले. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर रात्री 2 वाजता मुख्यमंत्री मालेगावला पोहोचले. रात्री 2 दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मालेगावकरांनी जंगी स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
आज मालेगावमध्ये बोलतांना अनेक योजनांची बरसात केली. एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील हे एकाच मंचावर होते.

आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंची सून स्मिता ठाकरे आणि नातू निहार ठाकरेंनी भेट घेवून पाठिंबा दर्शवल्याचे सांगितले. शिवाय मी मुलाखत देईन त्या दिवशी भूकंप होईल असा इशारा देखील त्यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना दिला. धर्मविरांच्या बाबतीत घडलेल्या घटनांविषयी बोलणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याला विकास निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी मोदींनी कौतुकाची थाप दिल्याचे अवर्जून सांगितले.

पश्चिम वाहिनी नदयांचे पाणी सिंचनासाठी वळवण्याची दादा भुसेंची मागणी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्हाला पहिल्या सारखं काम नको. ‘आगडम तगडम’ काम नाही पाहिजे. ‘डायरेक्ट फोन’ उचलला की काम झाले पाहिजे. रिक्षावाले, फेरीवाल्यांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मला अजूनही वाटतं नाही की, मी मुख्यमंत्री झालोय. मी 50 आमदारांना सांगितलंय तुम्ही सगळे म्हणजे 50 मुख्यमंत्री आहात. आगामी निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे आम्ही 200 आमदार निवडून आणणार आहोत. शासन आपल्या दारी हे आमच्या सरकारचे ब्रिदवाक्य आहे. आपल्याला ’आॅन द स्पाॅट’ निर्णय घ्यायचे आहेत. त्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य पिंजून काढू असेही ते यावेळी म्हणाले.

राज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने अमृत योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बचत गटांना कर्ज देण्यावर सरकारची भूमीका सकारात्मक राहिल. पाॅवर लूम व्यवसायाच्या अडचणी सोडवण्याचे काम सरकार करेल. कांदा उत्पादकांसाठी सरकार सकारात्मक राहिल. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 100 टक्के पंचनामे झाले आहेत. लवकरच मंत्रालयात बैठक घेवनू विविध योजना मार्गी लावणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच नाशिक मधून मालेगाव वेगळा जिल्हा करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आमचे सरकार पूर्ण करेल अशी ग्वाही त्यांनी मालेगाव करांना दिली.

हे सुध्दा वाचा:

राज्यपालांना कोल्हापूरचा जोडा दाखविण्याची गरज : उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

जयंत पाटलांनी राज्यपालांना दुसऱ्या राज्यात जाऊन राहण्याचा दिला सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी