30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंनी सांगितले, नितीन देशमुखांना पळविल्याचे कारण

एकनाथ शिंदेंनी सांगितले, नितीन देशमुखांना पळविल्याचे कारण

टीम लय भारी

गुवाहाटी : नितीन देशमुख यांना जबरदस्तीने का नेण्यात आले, या प्रश्नाचे एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने नेण्यात आलेले नाही. जबरदस्तीने नेले असते तर, सगळे आमदार गुवाहाटीपर्यंत पोहोचले असते का ? असा प्रतिसवाल शिंदे यांनी केला आहे.

नितीन देशमुख यांना सोडण्यासाठी आमचे दोन आमदार गेले होते, असेही शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांनी ‘एबीपी न्यूज’सोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांना नितीन देशमुखांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून सुटून मुंबईत परत आले आहेत. त्यांना जबरदस्तीने इंजेक्शन दिले होते. याविषयी आपण माहिती घेत आहोत, असे शिंदे म्हणाले.

आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच ठरवावे. माझ्यासोबत असलेल्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक होईल. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल, असे शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे व रश्मी वहिणींशी आमचे बोलणे होत असते. कालसुद्धा बोलणे झाले. भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी आम्ही अट घातलेली नाही. भाजपच्या संपर्कात सुद्धा नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारसरणी आहे. शिवसेनेने या विचारसरणीसोबत तडजोड करू नये, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारसरणीशी तडजोड करायला नको अशी आमच्या आमदारांची भूमिका आहे. शिवसेना व इतर असे एकूण ४६ आमदार आपल्यासोबत आहेत. आणखी पाचेक आमदार येऊ शकतील, असाही दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

आम्ही सर्व आमदार एकत्र बसून पुढे काय करायचे ते ठरवू. पण भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचे अद्याप काहीही ठरलेले नाही. भाजपच्या संपर्कात सुद्धा आम्ही नाही, असे शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज नाही. पण बाळासाहेबांच्या विचारसरणीशी तडजोड व्हायला नको, असे आमचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा :

खळबळजनक : आमदार नितीन देशमुखांना जबरदस्तीने रूग्णालयात कोंबले, सक्तीने इंजेक्शन दिले

उद्धव ठाकरे यांना ‘कोरोना’ची लागण, विधानसभा भंग करणार नाही

‘मविआ’च्या अपयशाला ‘कोरोना‘चा उतारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी