29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रBreaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिर

Breaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिर

टीम लय भारी

मुंबईः राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणूका जाहिर केल्या आहेत. मतदानाची तारीख 18 ऑगस्ट असून, मतमोजणी 19 तारखेला होणार आहे.

पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा जिल्हयाचा समावेश आहे. कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका झाल्या नव्हत्या. 4 मेला सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका जाहिर केल्या आहेत.

Breaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिरBreaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिरBreaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिरBreaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिरBreaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिरBreaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिर

ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका नको -नाना पटोले

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको. राज्य सरकारने मध्यस्थी करावी. अशी मागणी काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यावेळी म्हणाले की, राज्यातील ओबीसींचे राजयकीय आरक्षण घालवण्यात तत्कालीन फडणवीस सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. मध्य प्रदेशातही ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाला होता. पण सुप्रिम कोर्टाने त्यांना ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी मविआ सरकारवर केवळ राजकीय हेतूने आरोप करत आरक्षणाचे खापर फोडले होते. आता भाजप प्रणीत सरकार आले आहे. राजकीय मतभेद विसरुन भाजपा सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

हे सुध्दा वाचा:

आता राॅकेलप्रमाणे पेट्रोल होणार इतिहास जमा

VIDEO : उदय सामंत यांना उद्योग खाते मिळण्याची शक्यता… ऐका त्यांच्यात तोंडून

शाहजी बापूंचा ‘मुका‘ घ्या ‘मुका‘

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी