22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeमनोरंजन3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा...

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा 

आहाना कुमरा 2022 साली रिलीज झालेल्या मधुर भांडारकरच्या 'लॉकडाउन' चित्रपटात दिसली होती. आहाना कुमराने बॉलीवूडबद्दल अनेक खुलासे करत असतांना सांगितले की, बॉलिवूडमध्ये फक्त ए ग्रेड कलाकारांनाच काम मिळतं.  (aahana kumra eagerly waiting for good role since 3 years)

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण तिची ही इच्छा मागील 3 वर्षांपासून अपूर्ण आहे. आहानाने आज आपले दुःख व्यक्त केले आहे. तिने सांगितले की, 3 वर्षांपासून काम मिळालेले नाही. (aahana kumra eagerly waiting for good role since 3 years)

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

आहाना कुमराने सांगितले की, ती 3 वर्षांपासून चांगल्या पात्रांची वाट पाहत आहे. मात्र आजपर्यंत तिला एकही चांगली भूमिका मिळालेली नाही. यामुळे त्रस्त झालेल्या आहाना कुमराने चित्रपट निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत अहानाने सांगितले की, बॉलिवूडमध्ये फक्त ए ग्रेड कलाकारांनाच चांगले काम मिळते. (aahana kumra eagerly waiting for good role since 3 years)

‘भूल भुलैया 3’ ची रिलीज डेट जाहीर, दोन बिग बजेट चित्रपटांसोबत होणार टक्कर

आहाना कुमरा 2022 साली रिलीज झालेल्या मधुर भांडारकरच्या ‘लॉकडाउन’ चित्रपटात दिसली होती. आहाना कुमराने बॉलीवूडबद्दल अनेक खुलासे करत असतांना सांगितले की, बॉलिवूडमध्ये फक्त ए ग्रेड कलाकारांनाच काम मिळतं.  (aahana kumra eagerly waiting for good role since 3 years)

आहाना म्हणाली, ‘गेल्या ३ वर्षांपासून मी कामाची वाट पाहत आहे. मात्र आजपर्यंत मला कोणतेही काम मिळालेले नाही. मला कोणीही कामाची ऑफर देत नाही. मी OTT वर खूप काम करायची . पण मला बरेच दिवस काम मिळाले नाही. पण हे सर्व सुरूच आहे. बॉलीवूडमध्ये लोक फक्त ए ग्रेड कलाकारांनाच सतत काम देतात. एकतर चित्रपट निर्माते मोठ्या स्टारकडे जातात किंवा कमी पगाराच्या कलाकारांना कास्ट करतात. मी सुद्धा अजून काही काम करण्याचा विचार करत आहे कारण मला माझे घर देखील चालवायचे आहे.

आहाना कुमराने 2009 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली होती. बॉलीवूड हीरो या टीव्ही सीरियलमध्ये दिसल्यानंतर आहाना कुमराने अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले. एवढेच नाही तर तिने अनेक टीव्ही मालिका आणि ओटीटी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. आपल्या करिअरमध्ये आहाना कुमराने 39 हून अधिक टीव्ही मालिका, ओटीटी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. (aahana kumra eagerly waiting for good role since 3 years)

आहाना म्हणते, ‘लोकांनी मला एक चांगली अभिनेत्री म्हणूनही नाव दिले. यासाठी मी खूप मेहनत घेतली आणि लोकांनी माझी प्रतिभा ओळखली. पण अशा नावाचं काय अर्थ? एवढी नाव कमवल्यानंतर देखील मला एकही काम मिळत नाही आहे.  (aahana kumra eagerly waiting for good role since 3 years)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी