34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमनोरंजनIra Khan's Engagement : आमिर खानची मुलगी इरा खानची नुपूर शिखरेसोबत झाली...

Ira Khan’s Engagement : आमिर खानची मुलगी इरा खानची नुपूर शिखरेसोबत झाली एंगेजमेंट

खानची मुलगी आयरा खान हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आज मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. या एंगेजमेंटच्या निमित्ताने एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान मागच्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत आहे.खानची मुलगी आयरा खान हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आज मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. या एंगेजमेंटच्या निमित्ताने एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. काही महिन्यांआधीच नूपुरनं आयराला प्रपोज केलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे.आणि दोघांनी त्यांच्या फोटोंसह इंस्टाग्रामला लाल रंग दिला. दोघांचं लग्न कधी होणार याकडे लक्ष असतानाच दोघांनी साखरपुड्याची गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली.
आयरा खान आणि नुपूर शिकरे हे दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करतायत. एका सोहळ्यादरम्यान नुपूरने आयराला रिंग देऊन प्रपोजदेखील केले. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आयरा ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता हिची मुलगी आहे. आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे एक स्थान निर्माण केले आहे. 2019 मध्ये थिएटर प्रोडक्शन हाऊस ‘युरिपाइड्स’ मीडियाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. आयरानं या सोहळ्यात लाल कलरचा सुंदर गाऊन तर नुपूरनं ब्लॅक कलरचा टक्सीडो कॅरी केला होता. आयराची आई रीना खान ही देखील लेकीच्या साखरपुड्याला स्टायलिश अंदाजात पाहायला मिळाली . लेक आयराच्या साखरपुड्यात आमिर खान ही खूप खुश दिसत होता. तर लेकीच्या एंगेजमेंट सोहळ्यासाठी आमिर खाननेही विशेष अशी तयारी केली होती. या सोहळ्यामध्ये आमिर खानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. त्याचबरोबर या हटके लूकला आमिर खानची पांढरी दाढीही शोभून दिसत होती. या लूकला शोभेल असा आमिरने काळ्या रंगाचा गॉगलही घातला होता. त्यामुळे आमिरच्या या हटके लूकची चाहत्या वर्गात चर्चा होतेय.

हे सुध्दा वाचा

Bollywood : अटल बिहारींची भूमिका साकारणार पंकज त्रिपाठी; रवी जाधव करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

Mahesh Babu Father Passed Away : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले अभिनेता महेश बाबूच्या प्रिय व्यक्तीचे निधन

आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी संपूर्ण खान कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित दर्शवली होती. यामध्ये आमिर खान, किरण राव, आयराचा भाऊ जुनैद खान, आझाद राव खान यांच्यासह जवळची मित्र मंडळीही उपस्थित होती.त्याच दरम्यान आमिरचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो त्याच्याकुटुंबासह त्याच्या ‘पापा कहते है’ या आयकॉनिक गाण्यावर सुंदर असा डान्स करताना पाहायला मिळाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी