25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमनोरंजनआमीर खानचे पूजा करतानाचे फोटो व्हायरल; सोशल मीडियावर झाला ट्रोल

आमीर खानचे पूजा करतानाचे फोटो व्हायरल; सोशल मीडियावर झाला ट्रोल

बॉलीवूड अभिनेता आमिर खान त्याची विभक्त पत्नी किरण राव सोबत ऑफिसमध्ये पूजा करत असतानाचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आमिर खानच्या या फोटोंवर त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे.

बॉलीवूड अभिनेता आमिर खान त्याची विभक्त पत्नी किरण राव सोबत ऑफिसमध्ये पूजा करत असतानाचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आमिर खानच्या या फोटोंवर त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे. या फोटोंमध्ये आमिरसोबत त्याची विभक्त पत्नी किरण राव देखील दिसत आहे. आमिर खानने आपल्या नव्या प्रोडक्शन हाऊसच्या निमित्ताने पूजाविधी केले. या पूजापाठाचे फोटो ट्विटरवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर ट्रोल्स आमिर खानवर तूटून पडले. आमिर खानच्या या फोटोमध्ये त्याने महाराष्ट्रीयन टोपी घातलेली दिसत आहे.

काही ट्वि्टर वापरकर्त्यांनी त्याला ट्रोल करताना, लालसिंग चड्डा या चित्रपटाचा दाखला देत पुजापाठ केल्याने मलेरियाचा फैलाव होतो- लालसिंग चड्डा वाले आमिर खान असे म्हणत ट्रोल केले आहे.

 

तर आमिरच्या समर्थनार्थ एका ट्विटरवापरकर्त्याने म्हटले आहे की, आमिर खानने ने पूजा केली तरीही ह्या ढोंगी हिंदुत्वादी गॅँग ला अडचण, आमिर ने नमाज अदा केली तरी अडचण पण ह्यांचा मोदी केवळ बिर्याणीसाठी पाकिस्तानला जातो तेव्हा कुठे लपून बसतात. RSS ने सरळ सांगावे, आम्ही भारतीय मुस्लिमांचा राग करतो मग मुस्लिम देशाना मोदी कसे उत्तर देतात ते बघायचे मला.

 

एका ट्विटरवापर्कत्याने म्हटले आहे की, एके काळी अँटोनियो माईनो यांच्या रिमोट कंट्रोलखाली भारत असताना आमिर खान आनंदी होता. तो त्याच्या चित्रपटात हिंदूंची थट्टा करत होता. तो अनेक हिंदू महिलांशी लग्न करत होता. तो हज ला जाऊ शकत होता. आणि तेथे सैतानाला दगड मारु शकत होता. आता वाढत्या असहिष्णुतेमुळे या गरीबाला जबरदस्ती पुजापाठ करावा लागत आहे. आणि त्याच्या पत्नीला असुरक्षित वाटत नाही !

शर्लिन चोप्रा हीने अमिर खानचा फोटो आणि स्वत:चा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, तुम्हाला वाटते का आमीर खानने मनापासून सनातन धर्माचा स्विकार केला आहे. की हिंदू रितीरिवाजानुसार केवळ दिखाव्यासाठी त्याने ऑफिसमध्ये पुजापाठ केला आहे?

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!