26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजनअरिजितच्या आवाजातील 'आशिकी 3' चे गाणे लिक, सोशल मिडियावर झाले वायरल!

अरिजितच्या आवाजातील ‘आशिकी 3’ चे गाणे लिक, सोशल मिडियावर झाले वायरल!

सुपरहिट चित्रपट फ्रेंचायजि ‘आशिकी’ चा आता तिसरा भाग येणार आहे. ‘आशिकी’ आणि ‘आशिकी 2’ हे दोन्ही चित्रपट त्यामधील कथानक, कलाकारांचा अभिनय तसेच सुमधुर संगीत यामुळे प्रचंड गाजले होते. लवकरच या फ्रेंचायजिचा तिसरा भाग येणार असून काही दिवसांपूर्वीच याचा टीजर प्रदर्शित केला गेला होता. परंतु, आता ‘आशिकी 3’ वेगळ्याच कारणाने गाजत असून चित्रपटातील एक गाणे सोशल मीडिया वर लिक झाल्याचे समजले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एका हिंदी गाण्याचा एक छोटासा भाग प्रचंड वायरल होत आहे. वायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप मधील गाणे हे ‘आशिकी 3’ मधील गाणे असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण याबाबत, अजून ठोस पुष्टी मिळालेली नाही. वायरल झालेले गाणे हे सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह याने गायले असून गाण्याच्या शब्दांवरून हे एक ब्रेकअप सॉंग असल्याचे समजते. “वो जो तेरा हाल था कभी, वो जो तेरा प्यार था कभी, वो जो तेरे साथ था कभी, भूल जा.. ” असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याबाबत लोकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

‘आशिकी 3’ मध्ये मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यन दिसणार असून प्रमुख अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आले नाही आहे. ‘बर्फी’, ‘लुडो’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुराग बसू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर निर्माते मुकेश भट आणि टि सिरिज चे भूषण कुमार ह्या चित्रपटाचे निर्माते असतील.

हे हि वाचा 

प्राजक्ता कोळीचं एक्स बॉयफ्रेंडसोबत जुळलं… चाहत्यांना दिली गोड बातमी

आता रणबीर, टायगर घालणार बॉक्सऑफिस वर धुमाकूळ, आगामी अ‍ॅक्शन चित्रपटांचे पोस्टर्स प्रदर्शित

आपल्या अपंग फॅनचं प्रेम पाहून शाहरुखही भारवला!

1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या गाण्यातील संगीतांमुळे हा चित्रपट खूपच लोकप्रिय ठरला होता. 2013 मध्ये या चित्रपटाचा सिकवेल ‘आशिकी 2’ आला होता. ज्यामध्ये, आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच ‘आशिकी 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी