30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनअभिनेता किरण मानेंची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता किरण मानेंची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

टीम लय भारी

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून तडकाफडकी काढून टाकल्यानंतर, मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने प्रचंड चर्चेत आले आहेत. राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यावेळी सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.(Actor Kiran Mane’s passionate post goes viral onsocial media)

किरण माने यांनी याप्रकरणी केलेली भावूक पोस्ट सध्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मला खूप भरुन येतंय भावांनो… आमच्या सिरीयलमधल्या ज्या-ज्या महिला माझ्या बाजूनं उभ्या राहिल्या, त्या अत्यंत उत्स्फूर्तपणे पुढे आल्या.

हे सुद्धा वाचा

किचन कल्लाकार या कार्यक्रमात लवकरच दिसणार हा अभिनेता

राजकीय भूमिका मांडल्याने मालिकेतून केले तडीपार, मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

महाराष्ट्र वैचारिक दडपशाही खपवून घेणार नाही, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याची स्टार प्रवाहला तंबी

Marathi actor blames BJP for his removal from TV serial; producers say it was his misbehaviour on set

त्या म्हणाल्या, “सर ! प्रामाणिकपणानं आणि सच्चाईनं वागून त्याचं फळ म्हणून आम्हाला कामावरून काढून टाकणार असतील, तर एखादं स्नॅक्स सेंटर काढू आणि आनंदानं चालवू…पण अन्याय आणि खोटं सहन नाही करू शकत”, असं किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, एवढ्या गदारोळात अनिता दाते-केळकर, प्राजक्ता केळकर, श्वेता आंबीकर, शितल गीते आणि गौरी सोनार यांनी जे सत्व आणि स्वत्व दाखवलं याला तोड नाही! जगात स्त्रीचा सन्मान केला जातो, तो अशाच नितळ-निर्मळ आणि पारदर्शी वृत्तीच्या भगिनींमुळेच.

दरम्यान, प्राॅडक्शन हाऊस नाराज होणं परवडणारं नसतं आपल्या क्षेत्रात. तुम्हाला खरा किरण माने माहिती असला तरी रिस्क असल्याचं किरण माने यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे का होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी