27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमनोरंजनThe Kapil Sharma Show : अभिनेता कृष्णा अभिषेकने 'द कपिल शर्मा शो'...

The Kapil Sharma Show : अभिनेता कृष्णा अभिषेकने ‘द कपिल शर्मा शो’ मधून घेतली एक्झिट

द कपिल शर्मा शो लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या शो मध्ये आता यापुढे अभिनेता कृष्णा अभिषेक दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होणारा ‘द कपिल शर्मा शो’ हा कोणाला आवडत नसेल असे क्वचितच कोणी असेल. द कपिल शर्मा शो ने अल्पावधीतच लोकांच्या मनावर राज्य केले. या कार्यक्रमामधील सर्वच पात्रांना लोकांनी डोक्यावर घेतले. द कपिल शर्मा शो हा भारतातील एक असा शो आहे ज्या शो चे कार्यक्रम हे परदेशातही आयोजित करण्यात आले. लवकरच हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या शो मध्ये आता यापुढे अभिनेता कृष्णा अभिषेक दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शो च्या नवीन येणाऱ्या सीझनमध्ये निर्मात्यांकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. काही नवीन पात्र देखील या शो मध्ये सहभागी करण्यात आले आहेत. पण लोकांचा आवडता कृष्णा अभिषेकचं या सीझनमध्ये नसल्याने त्याच्या चाहत्यांनी नाराजी दर्शविली आहे.

कराराच्या मुद्द्याला धरून कृष्णा अभिषेक द कपिल शर्मा शो च्या या पर्वातून बाहेर पडला असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णा अभिषेक हा द कपिल शर्मा शो मधील लोकांचा सर्वाधिक चाहता बनला आहे. तो एक उत्तम डान्सर असला तरी त्याने या शोमध्ये केलेल्या महिलेच्या पात्रामुळे तो लोकांमध्ये अधिक प्रसिद्ध झाला. त्याच्या या पात्राला लोकांनी सुद्धा चांगली पसंती दिली. परंतु कृष्णा अभिषेक कराराच्या मुद्द्यामुळे या शो चा भाग बनणार नसल्याचे चाहते नाराज झाले आहे.

कृष्णा अभिषेक सोबतच प्रसिद्ध महिला कॉमेडियन भारती सिंग लिंबाचिया ही सुद्धा या शोमधील काहीच भागात दिसणार आहे. भारती सिंग ही सारेगमप लिटल चॅम्प्स चे सूत्रसंचालन करणार असल्याने ती द कपिल शर्मा शो च्या सर्व भागांमध्ये प्रेक्षकांना दिसणार नाही. त्यामुळे आता या नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांना आणखी कोणते चेहरे पाहायला मिळणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

हे सुद्धा वाचा

Sonali Phogat : भाजपच्या टिकटॉक स्टार नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू

Kapil Sharma : लोकांना खळखळून हसवणारा ‘कप‍िल शर्माचा शो’ पुन्हा येत आहे

Dahi Handi 2022 : मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारने दहिहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न

द कपिल शर्मा शो चे चित्रीकरण सुरु झाले असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हा गेस्ट म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक हा द कपिल शर्मा शो च्या या सीझनमध्ये दिसणार की नाही हे शो पडद्यावर आल्यावरच कळेल. पण सध्या तरी तो या शो चा भाग नसल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पाहावायास मिळत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी