30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमनोरंजनअभिनेता मुकेश खन्नाची बेशरम रंग गाण्यावर संतापजनक प्रतिक्रिया

अभिनेता मुकेश खन्नाची बेशरम रंग गाण्यावर संतापजनक प्रतिक्रिया

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण चित्रित 'बेशरम रंग' या त्यांच्या आगामी पठाण चित्रपटातील गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याबाबत अनेक जण आपले मत व्यक्त करत असतानाच शक्तिमान म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर संताप व्यक्त केला आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या पहिल्या प्रदर्शित झालेल्या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने बिकिनी घालून आपले नृत्य सादर केले आहे. परंतु यामध्ये दीपिकाने गाण्यावर नृत्य करण्यासाठी भगव्या रंगाची बिकनी घातल्याने वादाला तोंड फुटले आहे. या गाण्यामध्ये दीपिकाने घातलेल्या कपड्यांवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दीपिकाने या गाण्यांमध्ये नृत्य सादर करताना भगव्या रंगाची बिकनी घातल्याने हिंदू धर्माचा अपमान होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत अनेकांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. काहींनी या गोष्टीला समर्थन दिले तर नृत्यामध्ये कोणत्या रंगाचे कपडे वापरण्यात येतात. या मुद्द्यावरून वाद निर्माण करणे म्हणजे चुकीचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे.

अभिनेत्री पायल रोहतगी, स्वरा भास्कर आणि अनेक अभिनेत्यांनी या वादाच्या मुद्द्यात उडी घेत आपले मत व्यक्त केले आहे. यावर आता अभिनेता मुकेश खन्ना (Actor Mukesh Khanna) यांनी देखील आपले मत व्यक्त केलेले आहे. मुकेश खन्ना यांना सर्वजण “शक्तिमान” म्हणून देखील ओळखतात. याआधी देखील बॉलिवूडमध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टींवर पण मुकेश खन्ना यांनी आवाज उठवला होता आणि आपले मत व्यक्त केले होते.

बेशरम रंग गाण्यावरून निर्माण झालेल्या वादामध्ये उडी घेत मुकेश खन्ना म्हणाले की, ‘आजकालची मुलं टीव्ही आणि सिनेमे बघून मोठी होत आहेत. त्यामुळे सेन्सर बोर्डाने अशा गाण्यांना परवानगीच नाही दिली पाहिजे. सेन्सर बोर्ड काही सर्वोच्च न्यायालय नाही की त्याचा विरोध करता येऊ शकत नाही. तसेच आपला देश काही स्पेन नाही बनला, जिथे अशा प्रकारचे गाणे चालतील. सध्या अर्ध्या कपड्यात गाणी बनवली जात आहेत. काही दिवसानंतर कपडे न घालताच गाणी बनवली जातील. मला कळत नाही की सेंसर बोर्ड अशा गाण्यांना परवानगीच कसे देऊ शकते ?’

हे सुद्धा वाचा

‘ईडी’चे अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला ड्रग्ज प्रकरणी समन्स

सलमान खान आणि शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव रिद्धी डोगराने केला शेअर

‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे मराठी चित्रपटात

तर याउलट नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडणारी अभिनेत्री पायल रोहतगी हिने दीपिकाचे समर्थन केले आहे. ‘माझ्यामते हे आरोप अत्यंत बिनबुडाचे आहेत. एखाद्या रंगाला उद्देशून वाद निर्माण करणे हे चुकीचे आहे, दीपिकाच्या बिकिनीवर कोणत्याही सनातन धर्मातील देवी देवतांचे फोटो नाही आहेत. केवळ एका विशिष्ट रंगावरून एखाद्या कलाकृतीला विरोध कसा करता येऊ शकतो ?’ असे मत व्यक्त करत पायलने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण पायल ही नेहमीच बॉलिवुडविरोधी मत व्यक्त करताना दिसून येत असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी