28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजन'अभिनेता, लेखक अन् दिग्दर्शक' असा आहे सागर पाठकचा रंजक प्रवास

‘अभिनेता, लेखक अन् दिग्दर्शक’ असा आहे सागर पाठकचा रंजक प्रवास

एक मेहनती, सुजाण अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशा तिहेरी धुरा पेलवणारा सागर पाठक सिनेविश्वात चांगलाच रुळलाय. आपल्या अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत स्वतःच अढळ स्थान निर्माण केलंय.

मुंबई, पुण्यात कलाक्षेत्राचा वावर अफाट आहे. याच मुंबई, पुण्यातील कलाकार आपली आवड जोपासण्यासाठी कायम तत्पर असतात. बऱ्याचदा कोणीही गॉडफादर नसताना ही कलाकार मंडळी स्वमेहनातीच्या जोरावर येणाऱ्या अडचणींचा सामना करत आपला पल्ला गाठतात. अर्थात ही वाखाणण्याजोगी बाब आहे. असाच एक मेहनती, सुजाण अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशा तिहेरी धुरा पेलवणारा सागर पाठक सिनेविश्वात चांगलाच रुळलाय. आपल्या अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत स्वतःच अढळ स्थान निर्माण केलंय.

अभिनेता म्हणून मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सिंगल, डॉक्टर डॉक्टर, ये ना पुन्हा या चित्रपटात काम करून त्याने दिग्दर्शनात ही विशेष मेहनत घेतलीय. लग्न मुबारक, सिंगल या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सागर पाठक याने उत्तमरीत्या पेलवली. याशिवाय सांगायची बाब म्हणजे, प्रत्येकात एक हिडन टॅलेंट असतं, सागरही त्यापैकीच एक आहे. अभिनेता, दिग्दर्शक तर तो आहेच मात्र तो उत्तम लेखक देखील आहे. लॉकडाऊन लग्न, चतुर चोर, सिंगल, 2014 राजकारण, ये ना पुन्हा, लग्न मुबारक, डॉक्टर डॉक्टर या चित्रपटांच्या लेखनाची बाजू ही सागरने उत्तमरीत्या सांभाळली आहे.

हे सुद्धा वाचा

PHOTO: राज्यात लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक

हसन मुश्रीफ यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर काळाच्या पडद्याआड; मनोरंजनसृष्टीत शोककळा

एकूणच सागरचा चित्रपटसृष्टीतील वावर वाढतोय. त्याच्यातील टॅलेंटचा खजाना त्याने बाहेर काढला असून एकामागोमाग एक चांगले चित्रपट तो प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास घेऊन येतोय. याबाबत बोलताना सागर असे म्हणाला की, “कोणीही वारसा नसताना चित्रपटसृष्टीत कलेच्या जोरावर, कलेवरील प्रेमापोटी मी आलोय. आणि माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी खंबीर उभा आहे. एकूणच माझा सिनेविश्वातील प्रवास हा अविस्मरणीय आहे, आणि यापुढेही असेल. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून मला मिळालेल्या प्रेमाचं मी जीवाचं रान करून सोनं करेन यांत शंकाच नाही.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी