छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिल्पा शिंदे ही तिच्या बिंधास शैलीसाठीही प्रसिद्ध आहे. बिग बॉस हिंदीमधील ११ व्या सिजनमध्ये तिचं हे रूप सर्वांनीच पहिले आहे. अलीकडेच, अभिनेत्री शिल्पा शिंदे हिला डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’च्या सुरु असलेल्या 10 व्या पर्वातून निरोप घ्यावा लागला. पण डान्स शोमधून बाहेर आल्यानंतर शिल्पा या शोमध्ये असलेल्या परीक्षकांवर चांगलीच चिडलेली पाहायला मिळाली. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा राग व्यक्त केला आहे. झलक दिखला जा या शोला नोरा फतेही, माधुरी दीक्षित आणि करण जोहर जज करत आहेत. शिल्पा शिंदे हिने खासकरून या शोचा जज आणि निर्माता करण जोहर याला चांगलेच सुनावले आहे.
शिल्पा शिंदे हिने करण जोहरवर निशाणा साधला आहे. ज्याचा एक व्हिडिओ शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा म्हणते की, हा व्हिडिओ खास झलक दिखला जाच्या पॅनलमध्ये बसलेल्या जजसाठी आहे. मी निया शर्माचा शेवटचा परफॉर्मन्स पाहिला. तिच्यावर केलेल्या कमेंटवर मी गप्प राहिले. यावेळी परफॉर्मन्सनंतर केलेल्या कमेंट्सवरून मला करण जोहर सरांना विचारायचे आहे की, ते धर्मा प्रोडक्शनमध्ये चित्रपट देणार आहेत का ? नृत्यांच्या माध्यमातून तुम्हाला 3 मिनिटांत कोणता चित्रपट बघायचा आहे ?
View this post on Instagram
पुढे शिल्पा म्हणते की, खुर्चीवर बसून टिप्पणी करणे खूप सोपे आहे. परंतु एक स्पर्धक त्याच्या नृत्यासाठी किती मेहनत घेतो हे कोणालाही माहिती नाही. शेवटी, जर हा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल तर तो तसाच घ्यावा, असेही तिच्याकडून सांगण्यात आले आहे. शिल्पाच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
करण जोहर यांना डान्स येत नसताना देखील त्यांना या शोचे जज बनविण्यात आल्याने देखील तिने संताप केला आहे. तुम्ही सेलिब्रिटी लोकांना या शोमध्ये सहभागी करून घेता, त्यांना तुम्ही ऑस्कर किंवा नॅशनल अवोर्ड देणार आहात का ? असा प्रश्न यावेळी शिल्पा शिंदे हिने उपस्थित केला आहे. तसेच या शोच्या चित्रीकरणादरम्यान सहभागी स्पर्धकांना अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागते अशी माहिती सुद्धा यावेळी शिल्पा शिंदे हिच्याकडून देण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा
Riteish-Genelia New Movie : रितेश देशमुखकडून जेनेलियाला खास पाडवा गिफ्ट
शिल्पा शिंदे ही पहिल्यांदाच एका डान्स रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये तिने अनेक उत्कृष्ट असे नृत्य सादर केले. या शोमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री अमृता कुलकर्णी, बिग बॉसच्या 14 व्या पर्वाची विजेती रुबिना दिलेक, अभिनेत्री निया शर्मा, मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता गश्मीर महाजनी हे देखील सहभागी झालेले होते. ते अजूनही या शोचे स्पर्धक आहेत.