27 C
Mumbai
Thursday, November 16, 2023
घरमनोरंजनअन ऐश्वर्याचा पापाराझीशी मराठीत संवाद! हसत पोझंही दिली

अन ऐश्वर्याचा पापाराझीशी मराठीत संवाद! हसत पोझंही दिली

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन शुक्रवारी रात्री मुलगी आराध्यासोबत मुंबई विमानतळावर दिसली. आई-मुलीच्या जोडीची झलक पाहण्यासाठी विमानतळाबाहेर अनेक पॅप्स तैनात होते. फोटोग्राफर्सला आवरताना ऐश्वर्या चक्क ‘थांबा, थांबा’ असं मराठीत फोटोग्राफर्सशी बोलू लागली. तिनं गर्दीतून वाट काढत फोटोग्राफर्सला पोझ देत बायही म्हटलं. ऐश्वर्याचा आणि फोटोग्राफर्सचा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला. ऐश्वर्या आणि आराध्या त्यांच्या ट्रॅव्हल आउटफिट्समध्ये स्टायलिश आणि आरामदायक दिसत होत्या. विमानतळाकडे जाताना दोघींचा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्स धडपडू लागले. ऐश्वर्यानं वेळीच काही फोटोग्राफर्सना ‘काळजी घ्या, तुम्ही खाली पडणार आहात’ असं सांगत सुरक्षारक्षकांच्या मदतीनं मुख्य दरवाज्यापर्यंतचा रस्ता धरला. सुरुवातीला ऐश्वर्या हिंदीत फोटोग्राफर्सशी बोलत होती. मात्र गर्दी नियंत्रणात येत नसल्यानं तिनं थांबा अशी मराठीत मोठयानं सर्व फोटोग्राफर्सला हाक मारली.

मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचल्यानंतर तिनं फोटोग्राफर्सला चांगली पोझ देत त्यांना बाय म्हटलं. ऐश्वर्यानं वेळीच प्रसंगावधानता बाळगून तिनं मुलीसह दरवाज्यापर्यंत सुखरूप वाट धरली. त्या दोघीही कॅमेऱ्याकडे बघून हसल्या. फोटोग्राफर्सनं फोटोची मागणी करताच ऐश्वर्यानं पोझंही दिली. त्यानंतर ऐश्वर्या मुलीसह निघून गेली. सूत्रांच्या माहितीनुसार ऐश्वर्या पॅरिसला कामानिमित्तानं गेली.

गेल्या आठवड्यात, आई आणि मुलगी दोघींनी उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानी गणेश चतुर्थीच्या मेळाव्यात हजेरी लावली होती. ऐश्वर्या शेवटची मणिरत्नमच्या ‘पोनियिन सेल्वन 2’ मध्ये दिसली होती. २०२२ मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ऐश्वर्या व्यतिरिक्त, अभिनेते विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, पार्थिबन आणि विक्रम प्रभू यांनी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर ऐश्वर्याने तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती अजून उघड केलेली नाही.

हे सुद्धा वाचा
55 वर्षांच्या दिप्ती भटनागरचे तरुणींना लाजवेल असे ‘सौंदर्य’
काश्मीरच्या नदीत अंघोळ केलीस आता लग्न कधी करतोयस, चाहत्यांचा कार्तिकला थेट सवाल!
आता तू मालदिवलाच रहा; चाहत्यांचा सोनाक्षीला चिमटा !


‘पोनियिन सेल्वन ‘चा पहिला भाग म्हणजेच PS-1हा 2022 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कलेक्शन केले होते. PS-2 बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ तर होतीच. यामध्ये चोल राजवटीची कहाणी पुढे नेण्यात आली असून विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज आणि विक्रम प्रभू यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

या चित्रपटात ऐश्वर्या रायचे खूप कौतुक होत आहे. त्याच्या लूकपासून त्याच्या अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. असो, ऐश्वर्या बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसली त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील खुप उत्सूकता होती. त्यामुळे रिलिज होताच ‘Ponniyin Selvan 2′ या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्याने शानदार ओपनिंग घेतली. तर दुसरीकडे, वीकेंडलाही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने चांगलीच कमाई झाली, त्यामुळे याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झाला.’पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता हा चित्रपट लवकरच नवीन विक्रम तयार करेल असं काहीस चित्र दिसत आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 2’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी