29 C
Mumbai
Saturday, September 9, 2023
घरमनोरंजनअक्षय कुमार करणार एक्स गर्लफ्रेंड रविना टंडन आणि दिशा पटानी सोबत धमाल

अक्षय कुमार करणार एक्स गर्लफ्रेंड रविना टंडन आणि दिशा पटानी सोबत धमाल

अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्तानं ‘वेलकम 3’ चित्रपटाची शनिवारी घोषणा करण्यात आली. सिनेमात अक्षयसोबत त्याची एक्स गर्लफ्रेंड रवीना टडन झळकणार आहे. मात्र तरुण तुर्क अक्षयची जोडी तिशीतल्या दिशा पटानीसोबत झळकणार आहे. सोबत अक्षयसोबत कधीकाळी काम केलेली लारा दत्ता आणि जेकलीन फर्नांडिसही ‘वेलकम३’मध्ये झळकणार आहे. चित्रपटाची घोषणा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आली. हम दो पुराने चावल से कुछ सीखो, असं रविनाकडे बोट दाखवत अक्षयनं स्वतःला म्हातारं म्हणून स्वीकारालं की काय अशी गमतीशीर चर्चा सिनेवर्तुळात रंगली आहे.

अक्षय कुमारच्या ‘वेलकम’ या मूळ चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. ‘वेलकम’ अक्षय सोबत कतरीना कैफ झळकली होती. ‘वेलकम’ या मूळ चित्रपटात परेश रावलनं अक्षय कुमारच्या मामाची भूमिका साकारली होती. ‘वेलकम’च्या सिकवेलमध्ये अक्षयच्याऐवजी जॉन अब्राहमची वर्णी लागली. ‘वेलकम२’ फारसा चालला नाही. ‘वेलकम२’ मध्ये परेश रावल आणि जॉन अब्राहम पिता पुत्राच्या भूमिकेत होते. आता ‘वेलकम३’ मध्ये अक्षय कुमार परतलाय. अक्षय सोबत परेश रावल तर आहेच पण सुनील शेट्टी, संजय दत्त, हर्षद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कृष्णा अभिषेक,शरीब हाश्मी, जॉनी लिव्हर, मिका सिंग, दलर मेहंदी अशी तगडी स्टारकास्ट आहे.

या मल्टीस्टारर सिनेमात हीरोइनचापण मोठा फौजफाटा आहे. ९० चे एक्स प्रेमी युगुल अक्षय कुमार आणि रविना टंडन बऱ्याच वर्षानंतर स्क्रीन शेअर करत आहेत. साखरपुडा मोडल्यानंतर रवीनानं चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत लग्न केलं तर अक्षयनं ट्विंकल खन्ना सोबत संसार थाटला. रवीना लग्नानंतर घर संसारात रमली. वर्षभरापूर्वी रवीनानं नेटफ्लिक्सवर वेबसिरीज करत चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं. मध्यंतरीच्या काळात तिचा ‘मात्र’ हा चित्रपट कधी येऊन गेला हे समजलंच नाही. रवीनासोबत ‘वेलकम३’ चित्रपटात लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस आणि दिशा पटानीदेखील आहेत.

हे सुद्धा वाचा 
3 फुटांच्या पुंगनूर गायी पाच किलो चारा खातात आणि देतात पाच लिटर दुध
गिरीजा ओकला बॉलीवुडमध्ये आले सुगीचे दिवस
‘ये दिल मांगे मोअर’… कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पाकिस्तानी सैन्याने घेतला होता धसका

जॅकलीन फर्नांडिसचं पोलीस प्रकरण गाजताच अक्षय कुमारनं तिलाही हीरोइन म्हणून नाकारलं. इथेच दिशा पटानीची वर्णी लागली. आता अक्षय आणि दिशा पठाणीला प्रेक्षक स्वीकारतील, याबाबत साशंकता आहे. पन्नाशीपार अक्षय कुमारला ऐन तिशीतल्या दिशा पटानी सोबत काम करण्याची हौस का, असा प्रश्न नेटिजन्सला पडलाय.

या विचित्र स्टारकास्टला घेऊन ‘वेलकम३’चं कथानक जंगलात गुंफण्यात आलंय. एवढा मोठा फौजफाटा जंगलात काय करतोय, या सगळ्या भेसळीत विनोद घडतो का हा प्रश्न नेटिजन्स विचारत आहेत. मुळात कलाकारांची एकामागोमाग एक भरणी करत सिनेमा हिट ठरत नाही असं मत चित्रपट व्यापार तज्ञांनी दिलंय. सिनेमाचं दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत तर ज्योती देशपांडे, फिरोज नाडीयावाला सिनेमाचे निर्माते आहेत. ‘वेलकम३’ पुढच्या वर्षी २० डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी