28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरमनोरंजनअक्षय कुमारची स्कुटीवर हैदराबादची सफर! सहप्रवाशाला पाहून फॅन्स चक्रावले!

अक्षय कुमारची स्कुटीवर हैदराबादची सफर! सहप्रवाशाला पाहून फॅन्स चक्रावले!

बहुचर्चित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचा शूटिंग तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे सुरू आहे. सिंघम या चित्रपट मालिकेतील ‘सिंघम 3’ हा तिसरा भाग आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाचा मुख्य नायक अजय देवगण आणि अक्षय कुमारचा शूटिंग सध्या रामोजी फिल्मसिटी मध्ये सुरू आहे. या चित्रपटात अजय देवगण बाजीराव सिंघम आणि अक्षय हा वीर सूर्यवंशी च्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या शूटिंग स्थळी पोहोचण्यासाठी अक्षयनं दुचाकी घेत थेट रामोजी फिल्म सिटी गाठली. यावेळी अक्षय सोबत दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत दिसला.

गेल्या महिन्याभरापासून अधिक काळ हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. सिनेमाचं पहिल्या टप्प्यातलं शूटिंग संपवून करीना कपूर खान नुकतीच मुंबईत परतली. त्यानंतर या चित्रपटाचा शूटिंग पूर्ण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अक्षय हैदराबाद येथे पोहोचला होता. त्याचवेळी अक्षयचा एक फोटो सोशल मीडियावर व्हाययरल झाला. या फोटोत प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत अक्षय स्कुटी चालवताना दिसला.


अक्षय आणि प्रियदर्शन यांनी ‘हेराफेरी’ हा हिट सिनेमा केला आहे. त्यानंतर दोघांनी ‘भागम भाग’ चित्रपटही केला. ‘हेराफेरी’ आणि ‘भागम भाग’ चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. त्यापैकी ‘भागम भाग’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. चित्रपटाच्या अपयशामुळे अक्षय बरीच वर्ष प्रियदर्शन यांच्याशी संपर्कात नव्हता. तब्बल १४ वर्षानंतर दोघांचे नातेसंबंध पूर्ववत झाल्याचे फोटोतून व्हायरल झाल्यानंतर चाहते भलतेच खुश झाले आहेत. दोघेही आता नव्या सिनेमात एकत्र काम करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या चर्चेबाबत ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील निर्मिती टीमच्या एका सदस्याने स्पष्टीकरण दिले. “अक्षयचं हॉटेल आणि रामोजी फिल्म सिटी लांब अंतरावर होते. हॉटेल आणि रामोजी फिल्म सिटी मधील दीड तासाचं अंतर लवकर पार करण्यासाठी अक्षयनं स्कुटीची शक्कल लढवली. सिनेमाच्या शूटिंगला निघण्यापूर्वी अक्षय प्रियदर्शनचसोबत हॉटेलमध्ये होता. त्यानंतर दोघांनीही स्कुटीवरूनच रामोजी फिल्म सिटी गाठलं. अक्षय ‘सिंघम अगेन’ तर प्रियदर्शन एका दक्षिणात्य चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी रामोजी फिल्मसिटी मध्ये आले होते. हॉटेलमध्ये दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत संपूर्ण युनिटमधील कोणालाही कल्पना नाही.”

हे ही वाचा 

‘सिंघम अगेन ‘मध्ये ‘टायगर श्रॉफ’ची एन्ट्री

परीक्षेत कॉपी करायची आहे? आयुष्यमान खुरानाकडून टिप्स घ्या

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार?

‘सिंघम अगेन’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण ‘शक्ती शेट्टी’ नावाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात दीपिकाचा नवरा अभिनेता रणवीर सिंग आपल्या ‘सिंबा’ चित्रपटातील संग्राम भालेरावची व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटाच्या कथानकाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. आता चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि करीना कपूर खान, दीपिका पादुकोण ही मल्टीस्टारकास्ट काय धमाल उडवतेय, हे येणारा काळच ठरवेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी