33 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरमनोरंजनGuinness World Records: अक्षय कुमारने सेल्फी खेचतं केला नवा विश्वविक्रम; ३ मिनिटांत...

Guinness World Records: अक्षय कुमारने सेल्फी खेचतं केला नवा विश्वविक्रम; ३ मिनिटांत चक्क क्लिक केल्या एवढ्या सेल्फीज्

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. खरंतर अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट 24 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. अशा प्रसंगी अक्षय त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र दिसत आहे. मात्र अक्षय कुमारने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान असा विश्वविक्रम केला आहे की, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (Akshay Kumar selfie clicks set a New Guinness World Records)

खरं तर, अक्षय कुमारने बुधवारी मुंबईत त्याच्या आगामी ‘सेल्फी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका कार्यक्रमात तीन मिनिटांत जास्तीत जास्त सेल्फी घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. यासोबतच त्याने चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

या कार्यक्रमात अक्षय ऑरेंज जंप सूटमध्ये दिसला होता. यादरम्यान त्याने स्टेजवर 184 सेल्फी काढले. हा प्रसंग शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी आजपर्यंत जे काही मिळवले आहे आणि मी आयुष्यात कुठेही आहे, ते माझ्या चाहत्यांच्या बिनशर्त प्रेमामुळे आहे. हीच त्यांना माझी खास भावपूर्ण प्रेम आणि आदर असल्याचे मान्य करून माझ्या पाठीशी सदैव उभे रहावे, अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने चाहत्यांच्या मदतीने ३ मिनिटांत सर्वाधिक सेल्फी काढण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. याप्रसंगी तुम्हा सर्वांचे आभार, ते खूप खास होते आणि मला ते नेहमी लक्षात राहील, आता सेल्फी ‘सेल्फी’ होतील. शुक्रवारी चित्रपटगृहात भेटूया अशी  ही पोस्ट अपलोड करण्यासोबतच अक्षयच्या चाहत्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच त्याने प्रत्यक्ष या कमेंटवर प्रतिक्रिया ही दिल्या आहेत.

Guinness World Records: अक्षय कुमारने सेल्फी खेचतं केला नवा विश्वविक्रम; ३ मिनिटांत चक्क क्लिक केल्या एवढ्या सेल्फीज्

अक्षय कुमारच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. एका चाहत्याला कमेंट करत लिहिले आहे की- तुमचा हा जबरदस्त रेकॉर्ड पाहून खूप आनंद झाला. अक्षय कुमारने कपिल शर्माच्या शोमध्ये ‘लक्ष्मी’च्या प्रमोशनवेळी जे कपडे घातले होते तेच कपडे घातले आहेत, असे एका चाहत्याने निदर्शनास आणून दिले आणि कट्टर चाहता असल्याचे दर्शवून दिले. त्याचप्रमाणे या चित्रपटात अक्षय कुमारसोबत इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

हे सुद्धा वाचा : सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

Guinness World Records : महाराष्ट्रातील ‘हा’ पक्षीप्रेमी आहे जगातील सर्वात मोठा बर्ड फीडर..!

अभिमानास्पद : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीय संगीतकाराने रचला इतिहास !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी