कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्यानं अभिनेता ऋषी कपूर यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्यानं सकाळपासून अख्खं कपूर खानदान त्यांच्या आठवणीत बुडालंय. मुलगी रिद्धीमा सहानी-कपूर ते पुतण्या करिष्मा-करीना यांनी इंस्टाग्रामवर त्यांचा फोटो शेअर करत आपल्या चिंटू काकांच्या आठवणीना उजाळा दिला. मात्र सुनबाई आलिया भट्टनं दुपारपर्यंत आपल्या सासऱ्यांना इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून विश केलं नाही. त्यामुळे सासू-सुनेत बिनसल्याच्या चर्चाना पुन्हा उधाण आलंय. ऋषी कपूर यांचा कर्करोगासारख्या गंभीर आजाराने 2000 साली मृत्यू झाला. त्यानंतर आलिया आणि रणबीर नीतू कपूरसोबत काही दिवस राहिले. दोघंही लग्नाअगोदर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.
आताआलिया पती रणबीर कपूर, मुलगी राहासह विभक्त राहते. आलियानं राहा चार महिन्यांची असतानाच पुन्हा कामाला सुरुवात केली. ‘रॉकी और रानी’ चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगसाठी आलिया राहाला घेऊन काश्मीरला गेली. त्यानंतर पुरस्कार सोहळ्यात डान्स परफॉर्म करणं, ब्रँड प्रमोशनसाठी परदेशवारी, ‘रॉकी और रानी’साठी देशभर प्रमोशन करणं आदी कारणांमुळे सासू नीतू कपूर यांच्याशी आलियाचं बिनसल्याची कुजबुज सुरु झाली. दिल्लीत नीतू कपूर यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात आलिया कपूर मुलीसह गैरहजर राहिली. त्यावेळी सासूसुनेतील वादाबाबत चर्चाना उधाण आलं. दोघींच्या भांडणात सासरे ऋषी कपूरवर आलिया का राग काढतेय, हा प्रश्न नेटीझन्सला पडलाय.
हे सुद्धा वाचा
गोविंदा आला रे आला…. आकर्षक रंगातली मडकी बाजारात दाखल
जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा
ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर-सहानीने वडिलांचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. स्टोरीजमध्ये ऋषी कपूर यांचा फोटो पोस्ट करत तुमची आज जास्तच आठवण येतेय. पप्पा, तुम्हांला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशी पोस्ट लिहिली. तर करिष्मा कपूर आणि करीना कपूर-खाननेही ऋषी कपूर यांचा फोटो पोस्ट करत आपल्या चिंटू काकांना शुभेच्छा दिल्या. मात्र आलियाच्या अलिप्त वागण्याबाबत सासू-सुनेचं भांडण टोकाला जातंय की काय अशी चर्चा आता सुरु झालीये.