31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमनोरंजनतब्बल ३२ वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकत्र झळकणार मोठ्या पडद्यावर!

तब्बल ३२ वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकत्र झळकणार मोठ्या पडद्यावर!

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. लायका प्रॉडक्शनने मंगळवारी आपल्या सोशल मीडिया खात्यावर याबाबतची माहिती दिली. ‘थलाईवा १७०’ असे या चित्रपटाचे नाव असेल. आता ‘थलाईवा १७०’ चित्रपटात ज्येष्ठ कलाकार अमिताभ बच्चनदेखील झळकतील अशी माहिती लायका प्रॉडक्शनने दिली.’थलाईवा १७०’पूर्वी, दोन्ही दिग्गज कलाकारांनी मल्टी-स्टारर ‘हम’चित्रपटात शेवटचे काम केले होते.

रजनीकांत आणि बिग बी यांच्याशिवाय या चित्रपटात राणा दग्गुबती, मंजू वॉरियर, दुशारा विजयन आणि फहद फासिल यांच्याही भूमिका आहेत. लायका प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली असून,टीजे ज्ञानवेल चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘जवान’ फॅम अनिरुद्ध रविचंदरने चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी उचलली आहे. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी ८० आणि ९० च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिलेत. या सिनेमांविषयी माहिती घेऊयात.

अंधा कानून

बिग बी आणि रजनीकांत दोघेही टी रामाराव दिग्दर्शित अंधा कानूनमध्ये पहिल्यांदा एकत्र आले होते. १९८३ साली अमिताभ बच्चन आपल्या करिअरच्या शिखरावर असताना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या अ‍ॅक्शन चित्रपटात हेमा मालिनी, रीना रॉय प्रमुख भूमिकेत होत्या. तर अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, डॅनी डेन्झोन्ग्पा आणि प्राण यांनी सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि १९८३ सालातील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला.

गिरफ्तार

प्रयाग राज दिग्दर्शित या चित्रपटात बिग बी, कमल हासन आणि पूनम ढिल्लन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात रजनीकांत यांनी छोटी भूमिका साकारली होती. रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या मित्राची भूमिका साकारली होती. चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा ठरला.

हम

९०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘हम’ चित्रपटाकडे पाहिले जाते या मल्टीस्टारर ऍक्‍शन क्राईम चित्रपटात अमिताभ बच्चन, गोविंदा, किमी काटकर, डॅनी डेन्झोंगपा, अनुपम खेर, कादर खान आणि रजनीकांत यांच्या प्रमुख भूमिका होत्या.हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्या वर्षातील चौथ्या क्रमांकाची कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटानंतर दोघेही एकत्र पुन्हा एकत्र झळकले नाहीत. रजनीकांत यांनी तामिळ चित्रपटांवर आपले लक्ष केंद्रित केले.

हे ही वाचा 

इटलीत दीपिका आणि हृतिक एकत्र? फोटोतून आलं सत्य समोर…

शाहरुखच्या अभिनेत्रीचा जीवघेणा अपघात, जीव वाचला पण…

रजनीकांतचा ‘जेलर’ घालतोय धुमाकूळ

रजनीकांत आणि तमन्ना यांच्यावर चित्रित झालेले ‘रुकावालाय्या’ गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेय. इंस्टाग्रामवर या गाण्याच्या सर्वाधिक रिल्स बनल्या आहेत. तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या वर्षी ‘अनचाय’ या सिनेमात दिसले होते. येत्या दिवसांत अमिताभ बच्चन टायगर श्रॉफ,क्रिती सॅनॉन यांच्या ‘गणपत’ आणि प्रभास, दीपिका पाडूकोणच्या ‘प्रोजेक्ट के’ मध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी