29 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरमनोरंजनबिग बींसोबत किंग खान; 17 वर्षानंतर जोडी येणार एकत्र

बिग बींसोबत किंग खान; 17 वर्षानंतर जोडी येणार एकत्र

तब्बल 17 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा एकत्रित फोटो सध्या ‘एक्स’ ( पूर्वीचे ट्विटर ) या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या फोटोवर खुद्द शाहरुखने प्रतिक्रिया दिली असून, इतक्या वर्षांनंतर एकत्रित काम करत असल्याचे त्याने सांगितले.

शाहरुख खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनी दोन हिट चित्रपट दिले. 2001 साली ‘कभी खुशी कभी घम’ आणि 2006 साली ‘ कभी अलविदा ना कहना’ या दोन चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी पिता पुत्राची भूमिका निभावली. दोघांचं ऑफ स्क्रीन बॉण्डिंगही खूप चांगलं आहे. शाहरुख ज्येष्ठ अभिनेत्री आणि बिग बी यांच्या पत्नी जया बच्चन यांना आई मानतो. खान आणि बच्चन परिवाराचे सलोख्याचे संबंध आहेत. दोन्ही परिवाराचे एकमेकांकडे सतत येणे जाणे सुरू असते. शाहरुख खानने दहा वर्षांपूर्वी अभिनेता व अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपट केला. मात्र शाहरुख आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा स्क्रीन शेअर करण्याचा योग येत नव्हता.
हे सुद्धा वाचा 
ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांची मज्जाय बे!
‘गदर2’ मुळे सनी देओलला सुगीचे दिवस; 500 कोटींकडे वाटचाल
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

अखेरीस यंदाच्या वर्षी बिग बी आणि शाहरुख खान येत आहेत. काळ्या रंगाच्या सूटमध्ये दोघेही पळत असल्याचा फोटो वायरल होत आहे. ‘एक्स’ सोशल माध्यमावर सोहेल दिलवाले या तरुणाने ‘आस्क एसआरके’ ट्रेन्डमध्ये सहभाग घेतला. बिग बी आणि शाहरुख खानचा फोटो पोस्ट करत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काही सांगा, अशी विनंती सोहेल दिलवालेनं अभिनेता शाहरुख खानला गेली. बऱ्याच वर्षानंतर अमिताभ बच्चन सोबत काम केल्यामुळे बरं वाटतं आहे. शूटिंग संपवून घरी आलोय. या वयातही अमिताभ बच्चन यांनी पळण्याच्या स्पर्धेत हरवलं, अशी प्रतिक्रिया शाहरुखनं दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी