28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजनअमृता खानविलकर म्हणते, 'ललिता बाबर'चा चित्रपट हा माझा सर्वोच्च सन्मान

अमृता खानविलकर म्हणते, ‘ललिता बाबर’चा चित्रपट हा माझा सर्वोच्च सन्मान

अमृता खानविलकर ही ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटात दिसणार आहे. जगाच्या नकाशावर देशाचा आणि महाराष्ट्राचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात भूमिका करणारी अमृता खानविलकर म्हणते, ‘ललिता बाबर’चा चित्रपट हा माझा सर्वोच्च सन्मान आहे. (Amruta Khanwilkar says, ‘Lalita Babar’s film is my highest honour)

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. तिने निखळ सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जणू काही घर केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. अमृताने बॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अमृता एका बायोपिकमध्ये दिसणार असल्याचे समोर आले आहे. तसेच चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक देखील व्हायरल झाला आहे. अमृता खानविलकरचा हा पहिलाच बायोपिक आहे. त्यामुळे तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

यावेळी इंस्टाग्राम अकॉउंटला पोस्ट करत तिनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत याविषयी जाहीर केले आणि चित्रपटाबद्दल उत्सुकता दाखविली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

‘ललिता बाबर’ यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणाली की, ‘एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले, याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.’

हे सुद्धा वाचा : राखी सावंतला पोलिसांनी अटक केली नाही कारण…

‘पठाण’ला देशविदेशातून तुफान प्रतिसाद; शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटर्स डोक्यावर घेतली

Nilu Phule : सुपरस्टार निळू फुले यांचा बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. आजवर अनेक हिंदी शोज, चित्रपट राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे एंडेमॅाल शाईन इंडिया आणि मराठी कॅान्टेन्टला एका वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणार, हे नक्की!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी