30 C
Mumbai
Monday, August 28, 2023
घरमनोरंजनड्रीम गर्ल 2 ला तरुणाई भुलली; तीन दिवसांत कमावले 40 कोटी

ड्रीम गर्ल 2 ला तरुणाई भुलली; तीन दिवसांत कमावले 40 कोटी

नेत्वा धुरी, मुंबई : अभिनेता आयुष्मान खुराना आणि सोशल मीडिया सेन्सेशन अभिनेत्री अनन्या पांडे यांचा ‘ड्रीम गर्ल टू’ चित्रपट शुक्रवारी 25 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तीन दिवसात ‘ड्रीम गर्ल 2’ने 40 कोटी 71 लाखांची कमाई केली आहे. वीकेंडला ‘ड्रीम गर्ल 2’ ला प्रेक्षकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला. शहरात सिनेमा चांगला चालत असल्याची प्रतिक्रिया चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिली.  प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘ड्रीम गर्ल 2’नं 10 कोटी 69 लाख रुपये कमावले. शनिवारी 14 कोटी 2 लाख तर रविवारी सर्वात जास्त 40 कोटींचा बिजनेस झाला. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ नवनवे विक्रम रचत असताना ‘ड्रीम गर्ल 2’ ने तीन दिवसात 40 कोटी कमावले.

सिनेमाला तरुणांची पसंती मिळत आहे. सध्या सणवाराचे दिवस सुरू असताना ‘ड्रीम गर्ल 2’ वेळ मारून नेईल अशी आशा चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केली. प्रदर्शनाच्या तीन आठवड्यात ‘गदर 2’ने 450 कोटीपर्यंत कमाईचा नवा विक्रम रचलाय. ‘गदर2’ची हवा अजूनही ताजी असल्याने ‘ड्रीम गर्ल 2’ 100 कोटी पर्यंतचा प्रवास करेल,याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाची भूमिका असलेल्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. काळात अभिनेता आयुष्मान खुरानाचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता आयुष्मान खुरानाचे चित्रपट फारसे चालत नाहीयेत.
हे सुद्धा वाचा 
डिंपल क्वीन प्रीती झिंटानं जवळच्या व्यक्तीला गमावलं… इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट
सनी पाजीच्या गदर २ ने अक्षय कुमारचा ओएमजी २, रजनीकांतच्या जेलरला मागे टाकत कमावले इतके कोटी!
नीरजने रचला इतिहास; ठरला जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पटकावणारा पहिला भारतीय

दुसरीकडे अभिनेत्री अनन्या पांडेचा एक्टिंग शिकण्याचा स्ट्रगल अद्यापही सुरू आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटात अनन्य पांडेला मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाल्याने चित्रपटाबद्दल बऱ्याच जणांनी शंका व्यक्त केली होती. दोन्ही चित्रपट अभिनेता आयुष्यमान खुरानाने साकारलेल्या महिलेच्या पात्रावर फिरतो. आपले प्रेम मिळवण्यासाठी पैसे कमावण्याच्या महत्त्वकांक्षेत ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये आयुष्मान खुराना पुन्हा ‘पूजा’ ज्या महिलेची भूमिका स्वीकारतो. ‘ड्रीम गर्ल 2’ मधील ‘पूजा’ प्रेक्षकांना किती आवडली, याबाबत वीकेंडला कल्पना येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी