29 C
Mumbai
Saturday, September 9, 2023
घरमनोरंजनAzadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणवीस यांचा ‘मराठी द्वेष्ठेपणा’, मराठी...

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणवीस यांचा ‘मराठी द्वेष्ठेपणा’, मराठी कलावंतांचे कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीच्या कलावंतांना बोलविले

देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या निष्ठा आता नवी दिल्लीच्या दारात नेवून टाकल्या आहेत. निष्ठा जपण्यासाठी मराठी अस्मितेच्या तिनतेरा वाजल्या तरी चालतील. पण आपली राजकीय भूक भागविण्यासाठी दिल्ली दरबारात नाक घासण्याचे धोरण दृढ करायचे असे शिंदे यांनी ठरविलेले दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या निष्ठा आता नवी दिल्लीच्या दारात नेवून टाकल्या आहेत. निष्ठा जपण्यासाठी मराठी अस्मितेच्या तिनतेरा वाजल्या तरी चालतील. पण आपली राजकीय भूक भागविण्यासाठी दिल्ली दरबारात नाक घासण्याचे धोरण दृढ करायचे असे शिंदे यांनी ठरविलेले दिसत आहे. महाराष्ट्रात मराठी कार्यक्रम घेण्याची हिंमत सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राहिलेली नाही. किंबहूना ठरलेले मराठी कार्यक्रम रद्द करून तो दिल्लीला देण्याचा निर्बुद्धपणा एकनाथ शिंदे यांनी दाखविला असल्याची माहिती विश्वसणीय सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे खरंच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मराठी भाषेला आणि मराठी कलाकारांना डावलत आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशात यंदाच्या वर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत देशभरात वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’चे औचित्य साधून महाराष्ट्रात सुद्धा पु. ल. देशपांडे कला अकादमी मार्फत सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पु. ल. देशपांडे कला अकादमी मार्फत शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत स्पर्धा, लघुचित्रपट स्पर्धा आणि नाटक अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमी मार्फत ज्या कलाकारांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, अशा कलाकारांनी अकादमीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मार्फत हे आवाहन करण्यात आल्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी उपस्थित झालेल्या अंध, अपंग, महिला, पुरुष कलाकार यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे अर्ज देखील पाठवले. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना मानधन देण्यात येईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले. पण चार दिवसानंतर मात्र कला अकादमीकडे कलाकारांना देण्यासाठी मानधन नसल्याचे सांगत या कार्यक्रमातून मराठी कलाकारांना वगळण्यात आले.

पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे घेण्यात येणार हा कार्यक्रम मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. पण आता या कार्यक्रमामध्ये नवी दिल्ली येथील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा या संस्थेतील लोकांना काम देण्यात आले आहे. ज्यामुळे मराठी कलाकारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी कलाकारांनी या कार्यक्रमासाठी अर्ज करून सुद्धा त्यांना निरर्थक कारण देऊन या कार्यक्रमापासून लांब ठेवण्यात आले. पण याचवेळी पु. ल. देशपांडे कला अकादमीने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे.

पु. ल. देशपांडे कला अकादमीने हा निर्णय का घेतला. तसेच या अकादमीकडे मराठी कलाकारांना देण्यासाठी पैसे नाही पण त्यांच्याकडे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा संस्थेतील कलाकारांना देण्यासाठी पैसे आहेत, असे प्रश्न आता कलाकारांकडून उपस्थित करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमामध्ये अंध विद्यार्थी सुद्धा आपला कार्यक्रम सादर करणार होते. याचा सराव सुद्धा त्यांच्याकडून करण्यात येत होता. पण अकादमीने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे या अंध मुलांचा देखील हिरमोड झाला.

हे सुद्धा वाचा

Mantralaya: मुख्यमंत्र्यांकडे फायलींचा ढीग साचला, म्हणून त्यांनी…

Eknath Shinde : मंत्रीमंडळाच्या विस्ताराबद्दल एकनाथ शिंदे यांचे पहिल्यांदाच मोठे विधान

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाईंच्या मतदारसंघासाठी मंजूर केले 4 कोटी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पु. ल. देशपांडे अकादमीला अमाफ पैसा मिळतो. पण आमच्याकडे निधी नाही असे कारण पुढे करत अकादमीकडून मराठी कलाकारांचा अपमान करण्यात आला आहे. सुरुवातीला अकादमीकडून माहिती देताना ते नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे कला अकादमीकडून मराठी कलाकारांची फसवणूक झाल्याचे मत देखील व्यक्त करण्यात येत आहे. जर हा कार्यक्रम नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा संस्थेच्या विद्यमानाने हा कार्यक्रम करण्यात येणार आहे तर हा कार्यक्रम दिल्लीमध्ये करण्यात यावा, असे प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या या निर्णयामुळे मराठी कलाकारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. यावर मराठी चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक झगडे यांनी आक्षेप घेतला असून ते याबाबतच्या तक्रारीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीकडे मराठी कलाकारांना देण्यासाठी पैसे नाहीत मग गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालावधीतील पैसा गेला कुठे ? अकादमीला आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर गोष्टीतून भाडे तत्वावर मिळणारा पैसा कोणाच्या घशात जातो ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

पु. ल. देशपांडे कला अकादमीत सुरु आहे सावळा गोंधळ : मराठी चित्रपट ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक झगडे
पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून हा निर्णय घेण्यात आल्यानंतर मराठी चित्रपट ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक झगडे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. जर हा कार्यक्रम नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या संयुक्त विद्यमानाने आणि त्यांच्या कलाकारांना घेऊन करण्यात येणार आहे तर हा कार्यक्रम दिल्लीत करावा, असे मत अशोक झगडे यांनी व्यक्त केले आहे.

पु. ल. देशपांडे अकादमीचा सध्या सावळा गोंधळ सुरु असून मनमानी कारभार करण्यात येत आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम रद्द करून पुन्हा मराठी कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी