31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमनोरंजन2023 साली 'बडे मियाँ छोटे मियाँ' करणार धमाका

2023 साली ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ करणार धमाका

पूजा एंटरटेनमेंटचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' आहे. या चित्रपटात दर्शकांना 'फ्रेंचायझी पॉवर'सोबतच 'स्टार पॉवर'ही पाहायला मिळणार आहे. कारण या चित्रपटात पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पडद्यावर एकत्र दिसणार असून, याचा आस्वाद प्रेक्षकांना नक्कीच घेता येईल.

कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिस अप्रत्याशित झाले आहे. परंतु यादरम्यान एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे दर्शकांचे फ्रँचायझींवरील प्रेम. या वर्षी जिथे अनेक स्टार्स आपल्या चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात अपयशी ठरले, तिथे हिट चित्रपटांच्या फ्रँचायझींनी प्रेक्षकांना केवळ चित्रपटगृहांकडे आकर्षित केले नाही तर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत राज्य केले. त्यामुळे प्रेक्षकांचे फ्रँचायझींवरील प्रेम वाढत आहे हि गोष्ट स्पष्ट झाली आहे. यादरम्यान, ‘भूल भुलैया 2’ पासून ‘दृष्यम 2’ आणि ‘KGF: 2’ पर्यंत, या फ्रँचायझींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, 2022 मध्ये प्रेक्षकांना प्रभावित करणे कठीण असताना, काही विश्वासार्ह फ्रँचायझींनी यशस्वीपणे प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर मोठ्या संख्येने कमाई केली आहे.

आता 2022 हे वर्ष संपत येत असून 2023 वर्ष सुरू होणार आहे आणि अनेक चित्रपट त्यांच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच, चित्रपटांसाठी प्रेक्षकांचे निर्णय लक्षात घेऊन, असे म्हणता येईल की येत्या वर्षी फ्रँचायझी चित्रपट पुन्हा एकदा धमाल करतील आणि या फ्रँचायझी चित्रपटांपैकी एक पूजा एंटरटेनमेंटचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आहे. या चित्रपटात दर्शकांना ‘फ्रेंचायझी पॉवर’सोबतच ‘स्टार पॉवर’ही पाहायला मिळणार आहे. कारण या चित्रपटात पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पडद्यावर एकत्र दिसणार असून, याचा आस्वाद प्रेक्षकांना नक्कीच घेता येईल.

हे सुद्धा वाचा

आता शिवरायांच्या पंक्तीत मोदींना बसवू पाहत राज्यपाल ‘पॅकअप’च्या मूडमध्ये; घटनात्मक पदाचा प्रोटोकॉल धाब्यावर, राष्ट्रपतींऐवजी अमितभाईंकडे मागितले मार्गदर्शन!

VIDEO : 2007 अन् 2011 साली आपण जिंकलो कारण संघात युवराज सिंग होता

‘महाराष्ट्रात निर्भया फंडातून आमदार-खासदारांना वाहने खरेदी करून दिली जातात’

पूजा एंटरटेनमेंटचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले असून वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी निर्मिती केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे शिवाय प्रेक्षकांमध्ये सुद्धा या चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी