28 C
Mumbai
Wednesday, December 7, 2022
घरमनोरंजनBest Movies 2022 : सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत 'मेरे देश की धरती'

Best Movies 2022 : सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत ‘मेरे देश की धरती’

सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला दिसून येत असला तरी काही दर्जेदार बॉलीवूड चित्रपटही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. 2022 मध्ये अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण त्यातील मोजक्याच चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे.

सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला दिसून येत असला तरी काही दर्जेदार बॉलीवूड चित्रपटही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. 2022 मध्ये अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण त्यातील मोजक्याच चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. एका फिल्मी पोर्टलने जाहीर केलेल्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत कार्निवल मोशन पिक्चर्स’च्या ‘मेरे देश की धरती’ या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. ऍमेझॅान प्राइम व्हिडिओ’ वर ही ‘मेरे देश की धरती’चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

‘मेरे देश की धरती’ देश बदल रहा है हा वेगळया धाटणीचा चित्रपट त्यातील कथा आशयामुळे विशेष गाजला. वेगळा विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच यशस्वी ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा कल्पकतेचा अविष्कार. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन तरुण इंजिनिअर्स एका गावाचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ आणि संचालिका वैशाली सरवणकर ‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. कार्निवल ग्रुपचे चेअरमन डॉ. श्रीकांत भासी आपल्या निर्मितीसंस्थेमार्फत अशाच दर्जेदार कलाकृती आगामी काळातही प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत.

फराझ हैदर दिग्दर्शित ‘मेरे देश की धरती’ मध्ये मिर्झापूर फेम दिव्येंदु शर्मा, अनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात या आघाडीच्या कलाकारांनी एकच धमाल उडवून दिली आहे. याशिवाय ईंनाम्युल हक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!