29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनमराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांना देवाज्ञा

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांना देवाज्ञा

आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी आज शनिवारी सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, अशा 300 पेक्षा चित्रपटांत त्यांनी काम केले होते. 1984 साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

कोल्हापुरात चित्रीकरण झालेल्या काही हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. रा. छत्रपती शाहू मालिकेसह अनेक टीव्ही अनेक मालिकेतही त्यांनी काम केले होते. अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका केल्या कोणताही कोणतीही भूमिका दिली तरी ती अतिशय परफेक्ट करण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्षे सचिव तर अनेक वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.

भालचंद्र कुलकर्णी यांनी मर्दानी (1983), मासूम (1996), झुंज तुझी माझी (1992), हळद रुसली कुंकू हसलं (1991), माहेरची साडी (1991) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नवरा नको गं बाई, सोंगाड्या, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक या चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी