30 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजनभाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात 'एक फुल' रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’च्या यशानंतर भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा नवीन चित्रपट येऊ घातलाय तो म्हणजे ‘टीडीएम’. अनोख्या नावाच्या या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून त्यातील नवे कोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. खास व्हॅलेंटाईन डे निमित्ताने ‘टीडीएम’ चित्रपटात ‘एक फुल’ या रोमॅंटिक गाण्याची मेजवानी आपल्यासमोर सादर करण्यात आली आहे.

नेहमी आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, ‘टीडीएम’ची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. चित्रपटाचा संभ्रमात पाडणारे पोस्टर हा चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारे भाऊराव कऱ्हाडे ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर कॉमेडी जॉनर घेऊन आले आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मिती अशी दुहेरी धुरा त्यांनी सांभाळली आहे.

आजवर असे अनेक चित्रपट आहेत जे चित्रपटाच्या कथेसह चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत राहिलेत. अशातच भर घालत एक आगळावेगळा विषय घेऊन ‘टीडीएम’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीस आहेत. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटातील गाणी. नुकतंच चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं व्हायरल झालं असून प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहे. प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडेच्या सुमधुर स्वरात ‘एक फुल’ हे गाणं स्वरबद्ध झाले आहे.

bhaurao-karhades-tdm-film-hosts-ek-phool-romantic-songs

या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार रोहित नागभिडे यांनी पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत. ‘टीडीएम’ चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत. आता ‘एक फुल’ या गाण्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर साऱ्यांच्या नजरा चित्रपटातील इतर गाण्यांकडे वळल्या आहेत. मात्र त्यासाठी काही क्षणाचा विलंब लागणार आहे. लवकरात लवकर चित्रपटातील इतर गाणी ही ठेका धरायला लावण्यास सज्ज होणार आहेत, यांत शंकाच नाही.

हे सुद्धा वाचा : अभिमानास्पद : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीय संगीतकाराने रचला इतिहास

Amazon Prime Video : ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ सीझन 3 मधील पहिले रॅप गाणे झाले रिली

नागराज मंजुळे यांच्या ‘ झुंड ‘ सिनेमाचे गडकरींनी केले तोंडभरून कौतुक !

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत ‘टीडीएम’ चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. 28 एप्रिल 2023 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी