29 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमनोरंजनभाऊराव कऱ्हाडे यांचा गावराण तडका; 'टीडीएम' चित्रपटात पिंगळा गाणार शिवरायांची गाथा

भाऊराव कऱ्हाडे यांचा गावराण तडका; ‘टीडीएम’ चित्रपटात पिंगळा गाणार शिवरायांची गाथा

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’च्या यशानंतर भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तो म्हणजे ‘टीडीएम’. या अनोख्या नावाच्या चित्रपटाच्या पोस्टरनेतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलीच परंतु यातील ‘एक फुल’ या रोमॅंटिक गाण्यानेसुद्धा प्रेक्षकांना भुरळ पाडली. त्यानंतर आता भाऊराव कऱ्हाडे यांच्या याच चित्रपटात पिंगळा गातो शिवरायांची गाथा हे भावगीत सादर होणार आहे.

रात्र सरताना आणि सूर्य उदयाला येण्याअगोदर काही वेळाचा जो प्रहर असतो त्या वेळेचे पूर्वजांनी ‘पिंगळ वेळ’ असे नामकरण करून ठेवले आहे. या नावातही एक अनोखी गूढता दडलीये. ‘पिंगळ’ म्हणजे घुबड पक्षी अन् ‘पिंगळ वेळ’ म्हणजे त्याच्या ‘किजबिजण्याची वेळ… भाऊराव कऱ्हाडे यांच्या गावरण चित्रपटात “अन पिंगळा गातो, राजा शिवरायांची गाथा” असे बोल असणाऱ्या आणि दिवसाची सुरुवातच मोहक करणाऱ्या अशा या पिंगळ्याने केलेली शिवराजाची स्तुती नक्कीच कौतुकास्पद असणार आहे.

पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्रातली गावं पालथी घालत हाच पिंगळा खांद्याला भिक्षेची झोळी, हातात कंदील आणि एका हातात कुरमुड घेऊन वाट सरू लागतो. पारंपरिक पद्धतीने आणि शुभचिंतन देणारा हा पिंगळा हल्ली नाहीसाच झाला आहे. सध्याच्या तरुणाईला तर हा ज्ञात नसेल वा ऐकण्यातही नसेल. याच पिंगळ्याचा नवाकोरा अंदाज ‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘ स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे पिंगळ्यावर असणाऱ्या या गाण्यात पिंगळा खुद्द शिवरायांची कथा ऐकवतोय ते ऐकणं नक्कीच कानांना मंत्रमुग्ध करून सोडणारं आहे.

‘टीडीएम’ चित्रपटातील ‘पिंगळा’ या गाण्यात शिवबाची कथा आणि त्यांच्या मावळ्याचा पराक्रम हा पिंगळ्याच्या तोंडून ऐकायला मिळतोय. पिंगळ्याने केलेल्या या स्तुतीमध्ये ‘टीडीएम’ चित्रपटाचा मुख्य नायक पृथ्वीराजला त्याच्या कलागुणांना जोपासताना पाहणं ही उत्सुकतेचे ठरतंय. याच चित्रपटातील ‘एक फुल’ या गाण्याने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. आता या चित्रपटातील ‘पिंगळा’ हे मराठी मातीतील असं नवं कोर गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याच्या संगीताची आणि गायनाची बाजू गायक वैभव शिरोळे यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे, यांत वादच नाही. तर या गाण्याला दशरथ भाऊराव शिरोळे यांनी शब्दबद्ध केले आहे.

हे सुद्धा वाचा : 

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

‘एका गाण्याचा तिसरा भाग’ प्रशांत नाकतीने घातलाय युट्यूबवर धुमाकूळ

सचिन आंबात दिग्दर्शित ‘रूपाचं चांदणं, नाखवा’नंतर आता ‘सपान’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

नेहमी आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, ‘टीडीएम’ची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. चित्रपटाचा संभ्रमात पाडणारे पोस्टर हा चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारे भाऊराव कऱ्हाडे ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर कॉमेडी जॉनर घेऊन आले आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मिती अशी दुहेरी धुरा त्यांनी सांभाळली आहे. त्याचा टीडीएम हा चित्रपट 28 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी