बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन आपल्या येणाऱ्या चित्रपट ‘भूल भुलैया-3’ ला घेऊन चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीला प्रदर्शित होणारा आहे. कार्तिक आर्यनने चित्रपटाचे नवीन पोस्टर त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे पोस्टर पोस्ट करत कार्तिक आर्यनने लिहिले की, ‘दार उघडेल… या दिवाळीत.’ (bhool bhulaiyaa 3 poster released by kartik aaryan on his instagram)
तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण
दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी या चित्रपटाचे दोन भाग सुपरहिट झाले होते. भूल भुलैयाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. यानंतर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसले. आता कार्तिक ‘भूल भुलैया 3’ मधून मोठ्या पडद्यावर परतत आहे. (bhool bhulaiyaa 3 poster released by kartik aaryan on his instagram)
इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक
View this post on Instagram
12 ऑक्टोबर 2007 रोजी दिग्दर्शक प्रियदर्शनचा ‘भूल भुलैया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमार, विद्या बालन, अमिषा पटेल आणि शाइनी आहूजा यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. (bhool bhulaiyaa 3 poster released by kartik aaryan on his instagram)
भूल भुलैयाचा दुसरा भाग 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. 20 मे 2022 रोजी रिलीज झालेल्या भूल भुलैया-2 ने कमाईच्या बाबतीतही चमत्कार केला. हा चित्रपट दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला होता. 90 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 263 कोटींची कमाई करून सर्वांना चकित केले. आता या चित्रपटाचा तिसरा भागही यंदाच्या दिवाळीत रिलीजसाठी सज्ज आहे. (bhool bhulaiyaa 3 poster released by kartik aaryan on his instagram)