27 C
Mumbai
Friday, September 8, 2023
घरमनोरंजनअक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचं एकमेकांना आव्हान!

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचं एकमेकांना आव्हान!

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा ‘मिशन राणीगंज – द ग्रेट भारत रेस्क्यू’ आणि ‘थँक्यू फॉर कमिंग’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. गुरुवारी एकाच दिवशी दोन्ही चित्रपटांचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘मिशन राणीगंज-द ग्रेट भारत रेस्क्यू’ आणि ‘थँक्यू फॉर कमिंग’ ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहेत.

यंदाच्या आठवड्याच्या सुरुवातीला भूमी पेडणेकरच्या ‘थँक्यू फॉर कमिंग’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी रेहा कपूर ‘थँक्यू फॉर कमिंग’ चित्रपटाची निर्माती आहे. भूमी पेडणेकरनं कनिका कपूर या दिल्लीत राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. भूमी साकारत असलेल्या कनिकाला मुलांविषयी शारीरिक आकर्षणाची जास्त ओढ आहे.

मुलांसोबत शारीरिक संबंध कसे प्रस्थापित होतात याबद्दल कनिकाला बराच गोंधळ आहे. कनिकासोबत एका रात्रीत नेमकं काय घडतं, दारूच्या नशेत कनिका होणाऱ्या नवऱ्यासोबत रात्र घालवते की परपुरुषासोबत, या संकल्पनेवर ती चित्रपट आधारला आहे. लैंगिक शिक्षण मुलींनाही गरजेचं असतं. लैंगिक शिक्षणाबद्दल खुलेआमपणे बोलणं गरजेचं आहे, असं मत निर्माती रेहा कपूरने व्यक्त केलंय.

टिनू देसाई यांनी ‘मिशन राणीगंज -द ग्रेट भारत रेस्क्यू’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘मिशन राणीगंज -द ग्रेट भारत रेस्क्यू’ १९८९ साली पश्चिम बंगालमधील राणीगंज कोळसा खाडीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेच्या सत्य घटनेवर आधारित आहे. ६५ मजुरांच्या सुटकेचा थरारासाठी लढणाऱ्या जसवंत सिंग गिलची गोष्ट ‘मिशन राणीगंज -द ग्रेट भारत रेस्क्यू’ चित्रपटात मांडण्यात आली आहे. अभिनेता अक्षय कुमार जसवंत सिंग गिलची भूमिका साकारतोय.

बुधवारी ‘मिशन राणीगंज – द ग्रेट भारत रेस्क्यू’चा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ट्रेलर प्रदर्शित करत सिनेमा प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. भूमीनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘मिशन राणीगंज – द ग्रेट भारत रेस्क्यू’चा ट्रेलर पोस्ट केला. “चित्रपटाचा ट्रेलर आकर्षक आहे.
हे सुद्धा वाचा
एकनाथ शिंदे आयोजित दहिहंडी उत्सवाला प्रियकरासोबत आली रकुल प्रीत
अभिनेत्री प्राजक्ता शिंदे म्हणते, तुच तुझ्या आयुष्याचा ‘ड्रायव्हर’
दहिहंडीमधील काळे गोरे, गाढवाने उलघडले पदर सारे !


६ ऑक्टोबरला ‘द ग्रेट भारत चित्रपट दर्शनाचा योग आलाय.” या शब्दात भूमीनं अभिनेता अक्षय कुमारला आणि टीमला शुभेच्छा दिल्या. “६ ऑक्टोबरचा विकेंड दोन्ही चित्रपटासाठी चांगला ठरू दे, चित्रपटासाठी तुम्हालाही शुभेच्छा” असं अक्षय कुमारनं इंस्टाग्रामस्टोरीजवर रिपोस्ट केलं.’मिशन राणीगंज-द ग्रेट भारत रेस्क्यू’ आणि ‘थँक्यू फॉर कमिंग’ ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी