32.9 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरमनोरंजनBigg Boss 16 Finale: इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस विजत्याला मिळणार 'ही' मोठी...

Bigg Boss 16 Finale: इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस विजत्याला मिळणार ‘ही’ मोठी संधी!

बिग बॉस 16 फिनाले अवघ्या काही तासांत, बिग बॉसचा 16वा सीझन पूर्ण होऊन त्याला पूर्णविराम लागणार आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग अवघ्या काही तासांत सुरु होणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पर्धकांना अनेक प्रोजेक्टसाठी विचारणा होत असते. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांनादेखील ही संधी मिळाली आहे.

बिग बॉस 16 फिनाले अवघ्या काही तासांवर आला. बिग बॉसचा 16वा सीझन पूर्ण होऊन त्याला पूर्णविराम लागणार आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग अवघ्या काही तासांत सुरु होणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पर्धकांना अनेक प्रोजेक्टसाठी विचारणा होत असते. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांनादेखील ही संधी मिळाली आहे. रिॲलिटी शो बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर आहे. बिगबॉसच्या घरामध्ये शेवटपर्यंत टिकलेल्या टॉप ५ स्पर्धकांपैकी ट्रॉफी नक्की कोणाच्या हाती असेल हे 12 फेब्रुवारीला संध्याकाळी उघड होईल. यंदाचा पर्व बिगबॉसच्या अनेक पर्वांपेक्षा खूप वेगळा असल्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा जगभर सुरु आहे. दरम्यान फिनालेसाठी कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी खास संध्याकाळची व्यवस्था देखील केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच बिग बॉसचा शेवटचा भाग पूर्ण दोन-तीन तासांत संपणार नसून चक्क पाच तास चालणार आहे. (Bigg Boss 16)

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan)ने बिग बॉस शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत अनेक सीझन गाजवले. दरम्यान बिग बॉसचे 16वे पर्व आता अंतिम टप्प्यात आले आहे. काही तासांतच ‘बिग बॉस 16’चा विजेता/ विजेती कोण होणार हे लवकरच समोर येईल. शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, शालीन भनोत, एमसी स्टॅन, अर्चना गौतम या स्पर्धकांचा ‘टॉप 5’मध्ये समावेश झाला आहे. या पर्वात नाट्य, वाद, आव्हाने, ट्विस्ट अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पण आता या पर्वाच्या ग्रॅंड फिनालेकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पर्धकांना अनेक प्रोजेक्टसाठी विचारणा होत असते. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांनादेखील ही संधी मिळाली आहे. निमृत कौर अहलुवालियाला एकता कपूरच्या ‘एलएसडी 2’मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. अंकित गुप्ता आणि गौतम सिंह विग सध्या ‘जुनूनियत’ या त्यांच्या नव्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत. यंदाच्या पर्वात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा त्यांचा लाडका अब्दु रोजिक ‘बिग ब्रदर यूके’ या कार्यक्रमात दिसणार आहे. टीना दत्ताला एक बिग बजेट दाक्षिणात्य सिनेमा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, एकता कपूरला शालिनचा अभिनय आवडल्याने ‘ब्युटी अँड द बीस्ट’च्या हिंदी रिमेकमध्ये ती शालीन भनोटची निवड करणार आहे.

‘बिग बॉस 16’च्या ग्रॅंड फिनालेमध्ये ‘खतरों के खिलाडी’ फेम रोहित शेट्टीदेखील सहभागी होणार आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या पुढच्या पर्वासाठी रोहित ‘टॉप 5’ स्पर्धकांमधून एकाची निवड करणार आहे. अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या स्पर्धकांची निवड रोहित करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रोहित नक्की कोणाची निवड करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा : बॉलिवूडचे क्युट कपल सिद्धार्थ आणि कियारा झाले विवाहबद्ध; लग्नाचे फोटो पाहा

अभिमानास्पद : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीय संगीतकाराने रचला इतिहास !

‘पठाण’ला देशविदेशातून तुफान प्रतिसाद; शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटर्स डोक्यावर घेतली

शेवटचा भाग धमाकेदार होणार 

बिग बॉसचा ग्रँड फिनाले अर्थात शेवटचा भाग धमाकेदार होणार आहे. प्रेक्षकांना 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. या एपिसोडमध्ये काहीतरी खास पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्याची झलकही दिली आहे. बिग बॉसच्या घरातील टॉप ५ स्पर्धक प्रेक्षकांना धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहेत. त्याचप्रमाणे ग्रँड फिनालेमध्ये एक्स स्पर्धक (पूर्वी निष्कासित झालेले सदस्य) तुमच्या आवडत्या घरातील सदस्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सुंबुल तौकीर खान (सुंबुल तौकीर खान), अंकित गुप्ता (अंकित गुप्ता) आणि अनेक माजी स्पर्धक रोमांचक नृत्य सादर करणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी