सध्या सर्वीकडे मराठी बिग बॉसची चर्चा होत आहे. पहिल्या दिवसापासून हा शो चर्चामध्ये आहे. कधी कंटेंटस्टला घेऊन तर कधी शोचे नवीन होस्ट रितेश देशमुखला घेऊन चर्चा रंगल्या आहेत. यातच आता एका अभिनेत्याने रितेश देशमुखच्या होस्टींगवर वक्तव्य केले आहे. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)
अभिनेता सुशील इनामदारने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. यावेळी सुशीलने बिग बॉसच्या घरातील सदस्यांबद्दल आपले मत मांडले. याचबरोबर सुशीलने होस्ट रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनावरदेखील वक्तव्य केले आहे. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)
‘मुफासा – द लायन किंग’ चा हिंदी ट्रेलर रिलीज, शाहरुख खान सोबत ऐकायला मिळणार आर्यन आणि अबरामचा आवाज
सुशील म्हणाला, “रितेशचा एक क्लास आहे, एक दर्जा आहे. त्या पद्धतीने तो सदस्यांची शाळा घेतो. त्याची म्हणून एक वागण्याची पद्धत आहे. ती सांभाळून तो बोलतोय. मला माहितेय की, त्याला खूप राग येत असेल पण, त्याला तो उघडपणे व्यक्त करता येत नसेल. मला असं वाटतंय की, महेशसर असते, तर यांची अजून वेगळी शाळा झाली असती; पण तरीही रितेश ज्या पद्धतीने घरातील सदस्यांशी बोलतोय, त्यांचा कान पिळतोय, ते मला भयंकर आवडत आहे”. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)
बिग बॉसच्या मागील चार सीजनचे सूत्रधार अभिनेता महेश मांजरेकर यांनी केले होते. मात्र, यंदा रितेश देखमुखला होस्टिंग करण्याची संधी मिळाली. रितेश देशमुख म्हणेश मांजरेकरची जागा घेऊ शकेल का अशा प्रश्न सर्वानांच पडला होता. सोशल मीडियावर देखील याबाबत चर्चा होत होती. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)
क्रिती सेननच्या ‘या’ चित्रपटाचे बनणार सिक्वेल, अभिनेत्रीने केला खुलासा
यादरम्यान, रितेश देशमुखने पहिल्या आठवड्यापासूनच कंटेंटस्टची चांगलीच क्लास घेतली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना रितेशचा हा अंदाज फार आवडत आहेत. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)