बिग बॉस मराठीचा 5वा पर्व सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. हा पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी रितेश देशमुख यांना देण्यात आली. मात्र, काही लोकांना रितेश देखमुखचे सूत्र संचालन करणे फारस लोकांना आवडलं नाही. पण काही असे लोक पण आहे ज्यांनी रितेश देखमुखच्या या नवीन अवताराची प्रशंसा केली आहे. याचदरम्यान, आता बिग बॉस 3 मध्ये सदस्य म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री गायत्री दातारने रितेश देशमुखच्या होस्टिंगबाबत वक्तव्य केले आहे. (bigg boss marathi 5 Riteish deshmukh hosting is great said by gayatri datar)
शाहरुख खानचा नवा विक्रम, अतिश्रीमंतांच्या यादीत प्रथमच मिळाला प्रवेश
अभिनेत्री गायत्री दातारने रितेश देशमुखच्या होस्टिंगबाबत बोलताना म्हटले, “रितेश आणि जेनेलिया मला फार आवडतात. ते सगळ्यांना मान देऊन बोलतात. खूप मृदू बोलतात. रितेश देशमुख जेव्हा सूत्रसंचालन करणार आहेत, असं जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटतं होतं की, हे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना झापतील ना? पण जेव्हा पहिल्या आठवड्यातील भाऊचा धक्का बघितला आणि त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या भाऊच्या धक्क्याचे एपिसोड बघितले, तेव्हा वाटलं की, ते इतक्या कमाल प्रकारे शो कसे हाताळत आहेत.” (bigg boss marathi 5 Riteish deshmukh hosting is great said by gayatri datar)
बिग बॉस 5: रितेश देशमुखच्या होस्टिंगबाबत ‘या’ अभिनेत्याने म्हटलं असं काही…
गायत्री पुढे म्हणाली, “समोरच्याची आणि स्वत:ची प्रतिष्ठा राखून ते सदस्यांना त्यांच्या चुका सांगतात. त्यांचा एक वेगळा मार्ग आहे. भाऊचा धक्का हा एपिसोड मला फार आवडतो. त्यांची बोलण्याची, ड्रेसिंगची जी स्टाईल आहे, एकंदरीत ती संपूर्ण स्टाईलच वेड लावून जाणारी आहे. त्यामुळे मला ते ‘लैय भारी’ होस्ट वाटतात. महाराष्ट्राला ते वेड लावतच आहेत, अजून ते वेड लावतील, असं वाटतंय. महेशसरांनी याआधीचे सगळे सीझन होस्ट केले आहेत. तेदेखील कमालच होस्ट होते आणि रितेश देशमुखदेखील कमालच होस्ट आहेत.” (bigg boss marathi 5 Riteish deshmukh hosting is great said by gayatri datar)
प्रेक्षक आणि इतर अनेक कलाकारांनीदेखील रितेश देशमुखच्या होस्टिंगचे कौतुक केले आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांची कडक शब्दांत कानउघाडणी करतो. जे सदस्य चांगले खेळत आहेत, त्यांना शाबासकीची थाप देतो, हे पाहायला मिळाले आहे. आता या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर कोणत्या सदस्यांना त्यांच्या चुकीबद्दल रितेशची बोलणी ऐकावी लागणार आणि कोणता सदस्य शाबासकीची थाप मिळवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (bigg boss marathi 5 Riteish deshmukh hosting is great said by gayatri datar)