28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमनोरंजन'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणच्या आगामी 'राजा राणी' चित्रपटाचा ट्रेलर...

‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणच्या आगामी ‘राजा राणी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच

सुरजच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात बिग बॉस फेम वैभव चव्हाण सुद्धा उपस्थित होता. ('Bigg Boss Marathi 5' winner Suraj Chavan's upcoming movie 'Raja Rani' trailer launch)

यंदा मराठी’ सीझन 5 या पर्वाचे विजेतेपद सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सूरज चव्हाण यानी मिळवले आहे. बिग बॉस ५ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज आपल्या गावी मोडवे ,तालुका बारामतीत गेला आहे. सूरज ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह त्याच्या मोडवे गावातील आई मरिमातेच्या चरणी नतमस्तक झाला. यांनतर त्याने त्याच्या आगामी ‘राजा राणी’ चित्रपटाचा स्वतःच्या हस्ते ट्रेलर लॉंच ही केला आहे. (‘Bigg Boss Marathi 5’ winner Suraj Chavan’s upcoming movie ‘Raja Rani’ trailer launch)

गोविंदाला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल

बिग बॉस सीजन 5 जिंकल्यानंतर बारामतीत सूरजच्या हस्ते मोडवे गावात ‘राजा राणी’ चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करण्यात आलं. यावेळी सुरजच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात बिग बॉस फेम वैभव चव्हाण सुद्धा उपस्थित होता. (‘Bigg Boss Marathi 5’ winner Suraj Chavan’s upcoming movie ‘Raja Rani’ trailer launch)


‘राजा राणी’ या चित्रपटात सूरज चव्हाण महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. छोट्या पडद्यावर आपली कमाल दाखवल्यानंतर आता सुरज चित्रपटसृष्टीत आपली कमाल दाखवायला तयार आहे. सुरजचा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. (‘Bigg Boss Marathi 5’ winner Suraj Chavan’s upcoming movie ‘Raja Rani’ trailer launch)

गायिकेवर झालेल्या ऍसिड हल्ल्याची अनसुनी कहाणी ‘मंगला’ चित्रपटातून करणार थक्क

‘राजा राणी’ या प्रेम कथेतून सुरज महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रोहन पाटील , सुरज चव्हाण , तानाजी गळगुंडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्येही नायक नायिकेच्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी सूरज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतोय. ट्रेलरमध्येही त्याचा गोलीगत पॅटर्न पाहणं रंजक ठरतंय. (‘Bigg Boss Marathi 5’ winner Suraj Chavan’s upcoming movie ‘Raja Rani’ trailer launch)

चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील, वैष्णवी शिंदे ही जोडी दिसणार असून या चित्रपटात सुरज चव्हाण ,भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (‘Bigg Boss Marathi 5’ winner Suraj Chavan’s upcoming movie ‘Raja Rani’ trailer launch)

‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. (‘Bigg Boss Marathi 5’ winner Suraj Chavan’s upcoming movie ‘Raja Rani’ trailer launch) 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी