29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजन'देवी'च्या जन्मानंतर बिपाशा बासूचं काय झालं पाहा?

‘देवी’च्या जन्मानंतर बिपाशा बासूचं काय झालं पाहा?

बिपाशा बासू (Bupasha Basu) म्हणजे एकेकाळची बॉलीवूडची हॉटेस्ट अभिनेत्री म्हटल्यास चुकीचं ठरणार आहे. एकेकाळची एवढ्यासाठीच की, मुलीच्या जन्मानंतर बिपाशू बासूमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. बिपाशा आणि तिचा नवरा करण ग्रोवर (Karan Grover) दोघेही संसारात आणि मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. दोघे सतत मुलीशी खेळण्यात, तिला मोठी करण्यात बीझी झालेले दिसतात. त्यामुळे कधी काळी ‘जिस्म’सारख्या सिनेमात काम केलेली आणि ‘कॉर्पोरेट’मध्ये अभिनेत्रीचं दर्शन घडवणारी बिपाशा बासू हीच आहे का, असा प्रश्न कुणालाही पडेल. मातृत्वानंतर आयुष्य बदलून जातं, हे आतापर्यंत अनेक अभिनेत्रींच्या बाबतीत दिसून आलं आहे. त्याला बिपाशाचाही अपवाद ठरलेला नाही.

आता हेच पाहा ना बिपाशा बासू आणि करण ग्रोवर यांनी २०१६ मध्ये लग्नाची गाठ बांधली आणि त्यानंतर गेल्यावर्षी १२ नोव्हेंबरला त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. त्यांनी मुलीचं नाव देवी (Devi) ठेवलं. दोघेही तिचे खूप लाड करतात. आता देवी एक वर्षाची (Happy Birthday Devi) झाली आहे. देवी मोठी झाल्याने तिचे आईबाबा तिला असे घेऊन फिरत असतात.

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

हॉटबेबी हीच खरी बिपाशाची ओळख होती. विशेष म्हणजे लग्नानंतर तिनं नवऱ्यासोबत कंडोमची जाहिरात केली होती. त्यावरून बऱ्याच गरमागरम चर्चा झाल्या होत्या. मात्र, देवीच्या जन्मानंतर दोघांच्याही आयुष्यात मोठा बदल घडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

करण ग्रोव्हर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो कन्या देवीसोबत घालवतो, तिच्याशी खेळतो. धम्माल करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशादेखील जास्तीत वेळ मुलीला देते. कदाचित या आधी केलं ते सर्व मिथ्थ्या असावं, असं बिपाशाला आता वाटत असावं. असो आता करण आणि बिपाशा यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे. आधीची ‘ती’ बिपाशा आताची बिपाशा राहिलेली नाही. बिपाशाला आता क्षणभरही देवीशिवाय करमत नाही. शेवटी आई ही आईच असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

देवीला वेळ देत असतानाच बिपाशा तिच्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. नियमित जीम हे तिचं व्रत आजही कायम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

हे ही वाचा

आम्हीही जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवू पण, कार्यक्रम दिवाळीचा नसेल

शरद पवार लवकरच सरकारमध्ये; रवी राणांचं स्फोटक विधान

‘क्वीन’ कंगना कधी बनली ‘प्लॉप क्वीन’? आता देवदर्शनाचा सपाटा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी