32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरमनोरंजनAastha Sidana : बॉलिवूड अभिनेत्री आस्था सिदानाला ऑनलाईन गंडा; तब्बल इतक्या लाखांची...

Aastha Sidana : बॉलिवूड अभिनेत्री आस्था सिदानाला ऑनलाईन गंडा; तब्बल इतक्या लाखांची फसवणूक

सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटना मोठ्याप्रमाणात समोर येत आहेत. यामध्ये सेलिब्रिटींची देखील फसवणूक झाल्याच्या घटना या आधी देखील समोर आल्या आहेत. त्यातच आता. बॉलिबूड अभिनेत्री आस्था सिदाना हिची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटना मोठ्याप्रमाणात समोर येत आहेत. यामध्ये सेलिब्रिटींची देखील फसवणूक झाल्याच्या घटना या आधी देखील समोर आल्या आहेत. त्यातच आता. बॉलिबूड अभिनेत्री आस्था सिदाना (Aastha Sidana) हिची ऑनलाईन फसवणूक (cheated online) झाल्याची माहिती समोर आली आहे. आस्थाच्या बॅंक अकाऊंटमधून सायबर चोरट्याने तब्बल सहा लाख रुपये काढले आहेत. आस्था सिदाना हिला एक मेसेज आला होता. त्यात म्हटले होते की, केवायसी अपडेट न केल्यास तिचे बॅंक खाते निष्क्रिय केले जाईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आस्थाच्या बँक खात्यातून सायबर चोरट्याने सहा लाख रुपये काढले. याबाबत खार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी ज्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते बॅंक खाते गोठविण्याचे आदेश दिले.

आस्था सिदानाला एक बनावट लिंक आली होती. त्यावर तीने बँक खात्याची माहिती भरली, त्यानंतर तीच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले. पोलिसांनी सांगितले की, सायबर पथकाने तातडीने नो़डल अधिकारी, बॅंक प्रशासन आणि ई-वॉलेटशी संपर्क केला. आस्थाने लिंकमध्ये इंटरनेट बँकीग पिनचे विवरण भरले होते. मात्र तिने ओटीपी शेअर केला नव्हता.

हे सुद्धा वाचा

Bhopal News : दिल्ली पाठोपाठ मध्य प्रदेशातही ‘फटाके बंदी!’ वाचा काय आहे कारण…

Jacqueline Fernandez Money Laundering Case : जॅकलिनला दिलासा! पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून सुटका

IFTI Festivel : इफ्फी महोत्सवात ‘शेर शिवराज’ चित्रपटाची बाजी

तर आस्था सिदानाने सांगितले की, सायबर चोरट्याने मला लिंकवर ईंटरनेट बॅंकींगचा पिन टाईप करायला सांगितला. त्यानंतर मी पिन टाईप केला. त्यानंतर त्या व्यक्तीने मला ओटीपी मागितला, मात्र मला शंका आली. मात्र माझ्या फोनवर तोपर्यंत ओटीपी आला नव्हता. त्यानंतर लगेचच मी फोन कट केला. मात्र तरी देखील 10 मिनीटांनी मला बँक ट्रांझेक्शनचा मेसेज आला. त्यानंतर मला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

— रनवे 34 मध्ये केला होता एअसहोस्टेसचा रोल
आस्था सिदाना ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. उडन पटोदास या वेबसीरीजमुळे आस्था सिदानाचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यानंतर तीने रनवे 34 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत तिने या सिनेमात काम केले आहे. आस्थाने या सिनेमामध्ये एअरहोस्टेसचा रोल केला होता. आस्था सिदानाही दिल्लीची असून नुकतीच ती मुंबईमध्ये शिफ्ट झाली आहे. 2012 मध्ये आस्थाने मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!