28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमनोरंजनBollywood : बीग बजेट सिनेमे कशामुळे होताहेत फ्लाॅप?

Bollywood : बीग बजेट सिनेमे कशामुळे होताहेत फ्लाॅप?

अनेक सिनेमे अपयशी होण्यामागे आता अनेक कारणे समोर येत आहेत. कोरोना काळात प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफाॅर्मला जवळ केले. त्यामुळे प्रेक्षक इतर भाषांमधील सिनेमे, वेब सीरिज बघू लागले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत प्रेक्षकांची बदललेली आवड यावर बोलताना अभिनेता फरहान अख्तर याने सिने इंडस्ट्राबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी नमूद केल्या आहेत.

कोरोना संकट ओसरल्यानंतर बाॅलिवूड पुन्हा जोमाने पुढे जाईल असे वाटत असताना दिग्गज कलाकरांसहीत सगळ्यांचेच बीगबजेट सिनेमे चांगलेच आपटले. केवळ प्रतिसादच नव्हे तर प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवायला सुरवात केल्यामुळे कलाकारांपासून अगदी दिग्दर्शक सुद्धा यामुळे हैराण झाले आहेत. त्यांच्या समोर आता तर नवं एक संकटच येऊन उभं राहिलं आहे. दरम्यान, अनेक सिनेमे अपयशी होण्यामागे आता अनेक कारणे समोर येत आहेत. कोरोना काळात प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफाॅर्मला जवळ केले. त्यामुळे प्रेक्षक इतर भाषांमधील सिनेमे, वेब सीरिज बघू लागले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत प्रेक्षकांची बदललेली आवड यावर बोलताना अभिनेता फरहान अख्तर याने सिने इंडस्ट्राबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी नमूद केल्या आहेत.

अभिनेता फरहान अख्तर याने नुकतीच माध्यमांना मुलाखत दिली, त्यावेळी सध्या हिंदी सिनेमे का चालत नाहीत याची कारणे त्याने सांगितली. फरहान अख्तर यावेळी म्हणाला, प्रेक्षक आता ओटीटीवर परदेशी भाषांमधील कलाकृती बघत आहेत. प्रत्येक प्रेक्षकाला त्याच्या भाषेबद्दल आत्मियता असते. प्रत्येकाला त्यांच्या भावना त्यांच्या भाषेत व्यक्त झालेल्या आवडत असतात. अनेकदा केवळ एका शब्दांत अनेक भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात. परंतु जेव्हा बाहेरच्या लोकांशी बोलतो तेव्हा भावना थोड्या वेगळ्या असू शकतात. जेव्हा आपण ‘अलेक्झँडर द ग्रेट’ हा सिनेमा जेव्हा इंग्रजीमध्ये पाहतो तेव्हा आपल्याला काही अडचण येत नाही. अर्थात ही गोष्ट वेगळी आहे की रोमन लोकं देखील कधीच इंग्रजी बोलत नाहीत, असे म्हणून अख्तर याने लोकांची बदलती आवड उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा…

Amol Mitkari On Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटला अमोल मिटकरींनी दिले उत्तर

Jayant Patil : जयंत पाटील म्हणाले, मी सांगितलेले काम एकनाथ शिंदे ऐकतातच

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

फरहान अख्तर पुढे म्हणतो, ‘इंग्रजी कलाकृती पाहणं हे आजच्या काळात अगदीच स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु आता मला असं वाटतं की ही बंधनं तोडायली हवी आहेत. आपल्याला आता असं काही करायला हवं की भाषा कोणतीही असली तरी त्यात भावना व्यक्त करताना काही अडचण येऊ नये. ती सहजपणे व्यक्त करता यावी. माझ्या मते तरी ही गोष्ट फार मोठी नाही. उलट ही गोष्ट चांगली आहे. जगातील दुसऱ्या भाषेतील कलाकृती पाहणं सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे.’

मात्र, यासाठी बॉलिवूडला खूप प्रयत्न करावे लागतील आणि जागतिक पातळीवर प्रेक्षकांचा विचार करून कलाकृतींची निर्मिती करावी लागेल, असे म्हणत फरहानने यावर एक उदाहरण सुद्धा दिलं की, आपल्याला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी आपल्याला ‘द अॅवेंजर’नं जसं केलं तशी पद्धत अवलंबायला हवी. भाषेचा अडसर इथं येत नाही. पाहणाऱ्याला इंग्रजी येते की नाही याचा काहीच फरक पडत नाही. काही सिनेमे असे असतात की ते पाहून ही तुम्हाला कळतात. कलाकृतींचे निर्माते म्हणून आपल्याला तसा सक्षम कंटेन्ट तयार करण्याची गरज आहे. भाषेचा मुद्दा त्यानंतरच येतो. असे म्हणून हिंदी सिनेसृष्टीत नेमकी कशाची कमतरता आहे हे हेरून त्यावर प्रभावीपणे काम करण्याबाबत त्याने यावेळी सुचवले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी