विकी कौशल आणि कियारा अडवाणी एका नवीन डान्स नंबरसह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतले आहेत. हार्डी संधू आणि बी प्राक यांचे पंजाबी गाणे ‘क्या बात है 2.0’ तनिष्क बागचीने रिक्रिएट अर्थात नव्याने तयार केले आहे. गाण्याची सुरुवात कियाराने साखळदंडात बांधलेल्या विकीला सोडल्याने होते आणि ते दोघे मादक तालावर एकत्र नाचतात. या गाण्यामध्ये विकी कौशल आणि कियाराचा उत्तम केमिस्ट्री असलेला डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण इथे विकी आणि कियाराने किती छान डान्स केला आहे हे सांगण्याचा आमचा हेतू नाही तर बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षात विनाकारण काही पंजाबी गाण्यांचा समावेश करून या चित्रपटाला एक वेगळेच रूप देण्याचा प्रयत्न सध्या केला जात असल्याचे दिसून येत आहे.
खरे तर गेल्या काही वर्षांपासून असे अनेक चित्रपट बनत असल्याचे आपण पाहत आहोत, ज्यामध्ये पंजाबी गाणी जोडण्यात आली आहेत. या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. हा आजचा मुद्दा नाही. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये अनेक पंजाबी गाणी अशी आहेत जी रिक्रिएट केली जात आहेत. विशेषत: पंजाबी गाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. पूर्वी काही निवडक चित्रपट असे होते ज्यामध्ये जुनी गाणी रिमिक्स केली जायची किंवा अल्बमची गाणी बनवली जायची. पण आता अशी फॅशन झाली आहे की हे केले नाही तर चित्रपट चालणार नाही, असा समजच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
आजकाल बनत असलेल्या सर्व चित्रपटांमध्ये पंजाबी गाण्याचे रिमिक्स नक्कीच आहे. याचा अर्थ काय किंवा कारण काय ? ही गाणी पुन्हा बनवल्यास त्यात लोकांना काय नवीन दिसेल ! इतर प्रत्येक चित्रपटात त्यांना हे करायला भाग पाडलं जातं आहे. असे करून निर्मात्यांना काय सांगायचं आहे हे कळत नाही. विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांचे नवीन गाणे क्या बात है आज रिलीज झाले. दोघांनीही त्यात आपले ग्लॅमर जोडले आणि गाण्यात संगीत जरा जोरात केले. आपण कोणता प्रेक्षक शोधत आहात हे देखील आपल्याला समजत नाही, असेच आता दिसून येऊ लागले आहे.
अशी अनेक गाणी आहेत जी पुन्हा तयार केली गेली आहेत आणि पुन्हा रिलीज झाल्यानंतर त्यांच्या चित्रपटाची मौलिकता गमावली आहे. चित्रपट कितीही चांगला असला तरी, तुम्ही गाणे का रीक्रिएट केले म्हणून कधी ना कधी तुम्हाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. विकी कौशल चांगला अभिनेता आहे. त्यांनी असेच केले तर फॅन्सचा त्यांच्यावर कसा विश्वास बसेल ? याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.