28 C
Mumbai
Thursday, December 7, 2023
घरमनोरंजनBreath Into Shadow : 'ब्रीद: इनटू द शॅडोज'चे दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी...

Breath Into Shadow : ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’चे दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी प्रेक्षकांना उत्तेजित करण्याच्या योजनेबद्दल केला खुलासा

प्रीमियरची तारीख जवळ असतानाच, दिग्दर्शक मयंक शर्मा, ज्यांनी 'ब्रीद' फ्रँचायझीचे दिग्दर्शन केले आहे, या मालिकेसाठीच्या त्यांच्या योजनांबद्दल आणि सीझन 2 साठी प्रत्येक छोट्या तपशीलच्या पूर्व-नियोजनबद्दल खुलासा केला.

अमेझॉन प्राइम व्हिडिओचा ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन 2 प्रीमियर होण्यापासून फक्त एक दिवस दूर आहे आणि दर्शक हा शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ट्रेलर आणि कॅरेक्टर प्रोमोज समोर आले असून, सीझन २ अधिक तीव्र, सस्पेन्सफुल आणि माईंड गेम्सने भरपूर असेल. सीझन 2 मध्ये अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन, सैयामी खेर आणि इवाना कौर यांच्या भूमिका दिसणार असून, नवीन कस्तुरिया देखील या मालिकेत सामील झाले आहेत. प्रीमियरची तारीख जवळ असतानाच, दिग्दर्शक मयंक शर्मा, ज्यांनी ‘ब्रीद’ फ्रँचायझीचे दिग्दर्शन केले आहे, या मालिकेसाठीच्या त्यांच्या योजनांबद्दल आणि सीझन 2 साठी प्रत्येक छोट्या तपशीलच्या पूर्व-नियोजनबद्दल खुलासा केला.

मयंक शर्मा म्हणाले, “ब्रीद: इनटू द शॅडोज’ ची संकल्पना दोन सीझन साठीच होती. जर तुम्ही मागच्या सीझनची स्टोरी पाहिली तर ती खूप चांगली होती कारण आम्ही पुढे कुठे जाणार आहोत हे आम्हाला नेहमीच माहित होते. जेव्हा आम्ही पुढचा सीझन लिहीत होतो तेव्हा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. कारण अविनाश आणि जे हे दोन मोठे घटक सीझन 1 मध्ये तसेच C-16 चे रहस्य आधीपासूनच एकत्र आहेत. पुढच्या सीझनमध्ये C-16 भाग एक्सप्लोर करताना मला खूप मजा आली आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी या मोठ्या शोचा आनंद घ्याल.”

हे सुद्धा वाचा

T20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा पहिला फायनलिस्ट फिक्स!

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

Bharat Jodo Yatra in Maharashtra : शरद पवार भारत जोडो यात्रेला राहणार गैरहजर

प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवून मयंक शर्मा पुढे म्हणाले, “आम्ही सुमारे 3 वर्षांची वेळ घेतली आहे. आणि आम्ही मुद्दामहून अनोख्या पद्धतीने सीझन लिहिण्याचा आणि कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला असून, आमचा संपूर्ण दृष्टीकोन खूप वेगळा आहे. तुम्‍हाला पात्रे आणि त्यांचे हेतू माहित असले तरीही अविनाश, जे, कबीर, आभा, शर्ली आणि आता नवीन प्रवेशिका, व्हिक्‍टरच्या नव्‍या प्रवासाबद्दल उत्‍सुकता निर्माण करण्‍याचा आमचा 3 वर्षांपासून प्रयत्न आहे. व्हिक्टरचे पात्र खूप उत्सुकता आणि न पाहिलेली गतिशीलता वाढवणार आहे जी आपण मागील सीझनमध्ये पाहिली नाही, कारण हे सर्व योजनेचा भाग होते. आम्हाला वाटले की पहिल्या सीझनमध्ये आम्ही काही स्तर उघड करू आणि पुढे जाताना बाकीचे एक्सप्लोर करू. आम्हाला आशा आहे की प्रेक्षक थ्रिलचा आनंद घेतील आणि सीझन 2 मधील परिस्थिती आणि पात्र त्यांच्यावर कास्ट करणार आहेत.

ब्रीद: इनटू द शॅडोज सीझन 2 हा एक साइकोलॉजिकल थ्रिलर आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन, नवीन कस्तुरिया, सैयामी खेर आणि इवाना कौर मुख्य भूमिकेत आहेत. अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, आठ भागांची मालिका मयंक शर्मा यांनी दिग्दर्शित केली असून, त्यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत सीझन 2 ची सह-निर्मितीदेखील केली आहे. ही मालिका 9 नोव्हेंबर 2022 रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी