सेरेब्रल पाल्सी असोसिएशन संस्थेच्या बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी इंडिया फॅक्टरींग ॲन्ड फायनान्स सोलूशन्स प्रा.लि. आणि स्वराज्य युथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सांताक्रूझ पूर्व कालीना येथे ख्रिसमस चे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून, विद्यार्थ्यांसाठी आंतर स्पर्धा, म्युझिक शो आणि संगीताच्या तालावर सामुदायिक नृत्य यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले होते. (Cerebral Palsy Association celebrated Christmas)
या उत्साहात सीपीए सल्लागार व माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, स्वराज्य युथ फोरमचे संस्थापक चेतन कोरगांवकर, रेखा देशपांडे, सीपीए सल्लागार व रुग्णमित्र विनोद साडविलकर, गौरी दास (एचआर व मार्केटिंग प्रमुख), अमोल देशपांडे (वित्तीय नियंत्रक), रितू ब्रीद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Cerebral Palsy Association celebrated Christmas)
संस्थेच्या सीईओ मंजुषा सिंह, राजू गोल्लार, नम्रता मेहता, काव्या अविनाश सिंह, अनिता, प्रिया, विनय, कविता, रोशनी, आराध्या, वर्षा, सारीका, गीता, वासीम आणि कर्मचारी व पालक यांनी या कार्यक्रमाचे नियोजन आले होते. (Cerebral Palsy Association celebrated Christmas)