27 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरमनोरंजनगोरी नव्हते म्हणून रिजेक्ट केले; चिंत्रांगदा सिंहचा मोठा गौप्यस्फोट

गोरी नव्हते म्हणून रिजेक्ट केले; चिंत्रांगदा सिंहचा मोठा गौप्यस्फोट

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहने एका मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. टाल्कम पावडर बनविनाऱ्या एका मोठ्या ब्रँडने तीचा रंग गोरा नाही म्हणून तीला रिजेक्ट केले होते. ती म्हणाली मी म्यूझिक व्हिडीओ करत होती, मात्र एका टाल्कम पावडर बनविणाऱ्या मोठ्या कंपनीने माझा रंग गोरा नाही म्हणून मला रिजेक्ट केले.

चित्रांगदा म्हणाली त्यावेळी मी एका चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. मला वाटले होते माझ्यात ती क्षमता नाही, मात्र त्याच वेळी मला चित्रपटाची ऑफर आली. त्यावेळी मला वाटले ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे. त्यांना वाटत होते मी चांगले काम करु शकते. मला माहिती होते अनेकांनी त्या फिल्मसाठी ऑडिशन दिली होती. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ती फिल्म करायची होती असे देखील चित्रांगदा यावेळी म्हणाली.

चित्रांगदा म्हणाली, ज्यावेळी मी फिल्म करत होते त्यावेळी मी इतकाच विचार केला होता की, ही फिल्म सुधीर मिश्रा यांची आहे. त्याव्यतिरीक्त मी दुसरा कोणताच विचार केला नव्हता. या चित्रपटात माझ्याशिवाय केके मेनन, शाईनी आहुजा, सौरभ शुक्ला आणि राम कपूर देखील होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले होते.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदी करणार नव्या संसद भवनाचे 28 मे रोजी लोकार्पण

IAS टीना डाबी यांच्यावर कारवाई होणार; विस्तापित पाकिस्तानी हिंदूंची घरे पाडल्याप्रकरणी अडचणी वाढल्या

मैत्रिणीला मिठीत घेतले, मग गोळ्या झाडून केली हत्या; स्वत:ही केली आत्महत्या

चित्रांगदा सिंह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तीने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तीचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर देखील चांगली कमाई करतात. तसेच सोशल मीडियावर देखील ती खुपच अॅक्टीव्ह असते. 46 वर्षीय चित्रांगदा सिंह फॅशन आणि स्टाईलसाठी देखील खुपच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमीच फोटो पोस्ट करत असते.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी