30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमनोरंजनAzadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाहीचा आणखी एक...

Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाहीचा आणखी एक नमुना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मराठी कलाकारांवर अशा प्रकारचा अन्याय करण्यात येत असेल तर त्यास जबाबदार कोण ? पु. ल. देशपांडे अकादमीकडे मराठी कलाकारांना देण्यासाठी मानधन नाही, पण 'नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा' संस्थेतील कलाकारांना देण्यासाठी पैसे आहेत असा महत्वाचा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यापासून त्यांच्याकडून अनेक कामे करण्यात येत आहे. ते जनतेची काम हे फोनवरूनच करताना दिसून येत आहे. याबद्दलच्या वेगवेगळ्या क्लिप्स सुद्धा हल्ली व्हायरल होताना दिसतात. पण याच मुख्यमंत्र्यांच्या राज्यात मात्र मराठी कलाकारांना सापत्न वागणूक देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून वारंवार हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे सांगण्यात येते. परंतु या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये मात्र नागरिकांना आपल्या हक्कांसाठी लढता येत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. सध्या पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून मराठी कलाकारांचा अपमान करण्यात आलेले प्रकरण चांगलेच तापलेले आहे. याचमुळे मराठी रंगभूमीच्या कलाकारांकडून स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलन करण्यात येणार होते. पण हे आंदोलन पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या आवारात करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त नाटक, लघुपट, गायन याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी सुरुवातीस अकादमीच्या प्रशासनाकडून ज्या कलाकारांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अकादमीच्या कार्यालयात येऊन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मराठी कलाकारांनी आपले अर्ज पु. ल. देशपांडे कला अकादमीकडे सादर केले. या कार्यक्रमाचे त्यांचे मानधन देखील निश्चित करण्यात आले. पण चार दिवसांतच अकादमीकडे मराठी कलाकारांना देण्यासाठी मानधन नाही, असे सांगून मराठी कलाकारांना या कार्यक्रमापासून डावलण्यात आले.

परंतु या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, हा कार्यक्रम नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी कलाकारांना डावलून हिंदी भाषिक ते ही दिल्लीतील कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम मुंबईत पार पडणार असल्याची माहिती या कार्यक्रमातून डावलण्यात आलेल्या कलाकारांना मिळाली. पण या प्रकरणात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याची भावना कलाकारांनी बोलून दाखवली.

हे सुद्धा वाचा

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणवीस यांचा ‘मराठी द्वेष्ठेपणा’, मराठी कलावंतांचे कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीच्या कलावंतांना बोलविले

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणविसांना शिवसेना आमदाराने फटकारले

Azadi ka Amrit Mahotsav : भाजपच्या दृष्टीने देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मग अमृतमहोत्सवाची इव्हेन्टबाजी कशाला?

या प्रकरणी जेव्हा मराठी चित्रपट ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक झगडे यांनी आवाज उठवला आणि मराठी कलाकारांना घेऊनच हा कार्यक्रम करण्यात यावा, अशी मागणी केली तेव्हा त्यांना पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अशोक झगडे यांच्या नेतृत्वात पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात मराठी कलाकारांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिसांकडून अशोक झगडे यांना आंदोलन करण्यापासून मज्जाव करण्यात आला. तसेच जर का पोलिसांच्या परवानगीशिवाय प्रांगणात आंदोलन केले गेले तर झगडे यांना अटक करण्याची नोटीस पाठवण्यात येईल. आंदोलन करायचेच असेल तर ते आजाद मैदान येथे जाऊन करावे, अशी माहिती स्वतः अशोक झगडे यांच्याकडून ‘लय भारी’ ला देण्यात आली आहे.

जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मराठी कलाकारांवर अशा प्रकारचा अन्याय करण्यात येत असेल तर त्यास जबाबदार कोण ? पु. ल. देशपांडे अकादमीकडे मराठी कलाकारांना देण्यासाठी मानधन नाही, पण ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ संस्थेतील कलाकारांना देण्यासाठी पैसे आहेत असा महत्वाचा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये मराठी कलाकारांवर अन्याय होत आहे. तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रकरणाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत, असेच दिसून येतेय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी