30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमनोरंजनRaju Srivastav : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा नाहीच

Raju Srivastav : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा नाहीच

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात भरती करून आठ दिवस झाले असले तरी, त्यांच्या तब्येतीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. आता राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत अपडेट एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या आठ दिवसांपासून नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. जिममध्ये शारीरिक व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव हे चक्कर येऊन पडले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात भरती करून आठ दिवस झाले असले तरी, त्यांच्या तब्येतीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. आता राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत अपडेट एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. राजू श्रीवास्तव यांचा मेंदू पूर्णतः डेड अवस्थेत पोहोचला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व काही देवाच्या हातात असल्याचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

राजू श्रीवास्तव हे गेल्या आठ दिवसांपासून नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ढासळली. पण डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीत सुधारणा करण्याचा देखील प्रयत्न केला आणि काही अंशी ते यामध्ये यशस्वी देखील झाले. पण अचानक त्यांना ताप आल्याने पुन्हा एकदा त्यांची तब्येत ढासळली. ज्यामुळे आता राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा होणे कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

Comedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

Dahi Handi 2022 : शासकीय रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार

Azadi ka Amrit Mahotsav : ग्रीनफन फाऊंडेशनकडून वृक्षारोपण, कृष्णा चतुर्वेदी यांची उपस्थिती

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात राजू श्रीवास्तव यांना दाखल करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या मित्र परिवाराकडून देखील प्रार्थना करण्यात येत आहे.

राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदांमुळे तर प्रसिद्ध आहेतच, पण ‘गजोधर भैय्या’ नामक ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शो मधील व्यक्तिरेखेमुळे ते खूप जास्त प्रसिद्ध झाले. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. आजवर राजू श्रीवास्तव यांनी ‘बिग बॉस ३’, ‘नच बलिये’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या छोट्या पडद्यांवरील कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमांमधून देखील त्यांनी लोकांची वाहवाह मिळविली आहे. सध्या लवकरात लवकर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बरी व्हावी, अशी प्रार्थना सर्वांकडून करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी